Bjp MP, Actor Sunny Deol, who is on Manali tour, is Corona positive | मनाली फिरायला आलेले अभिनेते सनी देओल कोरोना पॉझिटिव्ह

मनाली फिरायला आलेले अभिनेते सनी देओल कोरोना पॉझिटिव्ह

भाजपाचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेते सनी देओल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मनालीला फिरायला गेले असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 


सनी देओल यांना ताप आणि गळ्यामध्ये खवखव जाणवू लागली होती. सनी देओल जवळपास एक महिन्यापासून हिमाचलमध्ये राहत आहेत. मंगळवारी त्यांनी कोरोना टेस्ट केली होती. ती पॉझिटिव्ह आल्याचे मनालीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित ठाकूर यांनी सांगितले. 
सनी देओल हिवाळ्यात मनालीला नेहमी येतात. यंदाही ते मुंबईहून मनालीला आले होते. मात्र, महिनाभरानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bjp MP, Actor Sunny Deol, who is on Manali tour, is Corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.