शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंनो, कायदा होत नाही तोवर सूट आहे, थांबू नका; मुलं जन्माला घालण्याबाबत भाजप आमदाराची मुक्ताफळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 09:06 IST

हिंदूंनो मुलं जन्माला घालत राहा, थांबू नका, असं वादग्रस्त विधान भाजपाच्या आमदारानं केले आहे.

मुझफ्फरनगर : वादग्रस्त विधाने करुन नेहमी चर्चेत राहणारे मुझफ्फरनगरच्या खतौली येथील भाजपा आमदार विक्रम सैनी यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली आहेत.  शुक्रवारी (23 फेब्रुवारी) मुझफ्फनगर येथे शिव चौक परिसरात लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपाचे आमदार विक्रम सैनीदेखील सहभागी झाले होते.  मुलं जन्माला घालण्यासंदर्भात विक्रम सैनी यांनी विचित्र तसंच वादग्रस्त विधान केले आहे. 

आरोग्य विभागाच्या 'हम दो हमारे दो' या घोषवाक्याबाबत बोलताना भाजपा आमदार विक्रम सैनी यांनी म्हटले की, 'हम दो हमारे दो' हे तर आम्ही ऐकले, मात्र आपल्यातील बहुतेकजण तर एकाच अपत्यावर अडकलेत. यावरच न थांबता त्यांनी पुढे आणखी विचित्र विधान करत म्हटले की, ''हम दो हमारे 18, हम पांच हमारे पच्चीस. कायदा सर्वांसाठी असावा, जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत हिंदू भावांनो तुम्हाला सूट आहे. थांबू नका'', असे वादग्रस्त विधान विक्रम सैनी यांनी केले आहे. 

विक्रम सैनी इथवरच थांबले नाहीत, कायदा बनेल तर तो सर्वांसाठी बनेल, असेही वक्तव्य करत त्यांनी खासगी आयुष्याबाबतही माहिती जाहिररित्या येथे मांडली. ''मला दोन अपत्य झाल्यानंतर तिस-या अपत्यास माझ्या पत्नीनं नकार दिला. त्यावेळी आणखी चार-पाच मुलं होणार, असे मी तिला सांगितले'', अशा पद्धतीनं वादग्रस्त वक्तव्य करताना सैनी यांनी आपल्या पत्नीलाही सोडले नाही. या विधानावरुन सैनींना महिलांचा अजिबात सन्मान नसल्याची चौफेर टीका होऊ लागली आहे.  गेल्या काही दिवसांपासून वाचाळवीर नेते हे भाजपसाठी डोकेदुखी ठरु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार नेपालसिंह यांनीदेखील सैनिकांबाबत वादग्रस्त विधान केले होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैन्याच्या जवानांचा अवमान करणारे विधान भाजपा खासदार नेपालसिंह यांनी केले होते. ‘सैन्याचे जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचा जवान मरत नाही’ असे संतापजनक विधान नेपालसिंह यांनी केले होते. यावरुन नेपालसिंह यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. 

 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश