शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Video : माझी ताकद तुम्हाला माहीत नाही का? भाजपा आमदाराची महिला अधिकाऱ्याला दमदाटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 15:32 IST

आग्रा जिल्ह्यातील फतेहपूर सीकरीमध्ये एका भाजपा आमदाराने महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देभाजपा आमदाराने महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असं या भाजपा आमदाराचं नाव असून चौधरी यांनी उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांना धमकावलं आहे.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदयभान चौधरी यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

आग्रा - आग्रा जिल्ह्यातील फतेहपूर सीकरीमध्ये एका भाजपा आमदाराने महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असं या भाजपा आमदाराचं नाव असून चौधरी यांनी उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांना धमकावलं आहे. ‘तुम्हाला माहिती नाही का मी आमदार आहे? तुम्हाला माझी ताकद कळली नाही का? लोकशाहीची ताकद कळली नाही का ?’ अशा शब्दात उदयभान चौधरी धमकावत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अनेक गावातील शेतकऱ्यांनी सोमवारी (17 डिसेंबर) किरावली येथील तहसील कार्यालयाला घेराव घातला होता. याच दरम्यान संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी भाजपाचे आमदार उदयभान चौधरी यांना घेरलं आणि घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी चौधरी यांनी उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांना धमकावलं आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

उदयभान चौधरी हे भाजपाचे फतेहपूर-सिकरीचे आमदार आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदयभान चौधरी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. मात्र त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करत माफी मागण्याची कोणतीही गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच उप-विभागीय दंडाधिकारी लोकांचं म्हणणं ऐकून घेत नसल्याचा आरोपही चौधरी यांनी केला आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरी