शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ताजमहालचं नाव बदलून राममहाल करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 15:20 IST

भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांचं विधान

लखनऊ: वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी आता ताजमहालचं नाव बदलण्यात यावं, असं वक्तव्य केलं आहे. ताजमहालाचं नाव बदलून राममहाल किंवा कृष्णमहाल केलं जावं, असं उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बैरिया विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या सिंह यांनी म्हटलं. 'जर कोणी भारतातील संसाधनांचा, इथल्या मातीचा वापर करुन स्मारक उभारलं असेल, तर ते देशाचं आहे. त्या स्मारकाला कोणी स्वत:च नाव देत असेल, तर ते चांगलं नाही,' असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं. यावेळी त्यांना ताजमहालचं नाव बदलण्यात यावं का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, ताजमहालचं नाव बदलून ते राममहाल किंवा कृष्णमहाल करायला हवं. माझ्या हातात असतं तर मी ताजमहालचं नाव बदलून राष्ट्रभक्त महाल केलं असतं,' असं सिंह म्हणाले. सुरेंद्र सिंह त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्रय करणाऱ्या महिला जास्त चारित्र्यवान असतात, असं विधान काही दिवसांपूर्वीच सिंह यांनी केलं होतं. 'वेश्या पैसे घेऊन किमान काम तरी करतात, त्यांना पैसे दिल्यावर त्या स्टेजवर नाचतात. मात्र अधिकारी पैसे घेऊनही करतील, याची खात्री देता येत नाही', असं सिंह यांनी म्हटलं होतं. 'घूस मांगे तो घूसा दो, नहीं माने तो जूता दो', अशी घोषणाही त्यांनी दिली होती.  

टॅग्स :Taj MahalताजमहालBJPभाजपाMLAआमदारUttar Pradeshउत्तर प्रदेश