लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारच्या कोरोना व्यवस्थापनावर भारतीय जनता पक्षाचे आमदारच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राज्यातील परिस्थिती भीषण असून मदतीसाठी येणाऱ्यांना उपचारदेखील पुरवता येत नसल्याची पत्रं अनेक आमदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवली आहेत. लखनऊ मध्यचे आमदार आणि मंत्री बृजेश पाठक यांनी सर्वप्रथम अशा प्रकारचं पत्र आदित्यनाथ यांना लिहिलं होतं. आता लखीमपूर खिरीचे आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून असहायता व्यक्त केली आहे.मोठी बातमी! नागपूरचे ऑक्सिजन टँकर्स गुजरातला नेण्याचा प्रयत्न उधळलालोकांचे मृत्यू होत आहेत आणि त्यांचे जीव वाचवण्याची इच्छा असूनही आम्ही काहीच करू शकत नाही, अशा भावना आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत. लोकांचे मृत्यू होत आहेत आणि मदत करायची असूनही आम्हाला मदत करता येत नाही, असं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे. कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पत्र लिहून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली आहे.
CoronaVirus News: माणसं डोळ्यादेखत मरताहेत, आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराकडून योगी सरकारचे वाभाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 18:16 IST