शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

VIDEO : फाटलेला कुर्ता अन् रस्त्यावर गोंधळ, भाजपा आमदाराने केला एसपींवर मारहाणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 18:00 IST

bjp mla dheeraj ojha said sp beat him in office at pratapgarh in uttar pradesh : धीरज ओझा प्रतापगड जिल्ह्यातील राणीगंज येथील भाजपाचे आमदार आहेत.

ठळक मुद्देफाटलेल्या कपड्यांमध्ये ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आले.

प्रतापगड - उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यातील भाजपाचे आमदार धीरज ओझा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी (एसपी) त्यांना कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप करत भाजपा आमदार फाटलेला कुर्ता दाखवत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये आमदार रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहेत आणि आजूबाजूला लोकांची गर्दी दिसून येत आहे. (bjp mla dheeraj ojha said sp beat him in office at pratapgarh in uttar pradesh)

राणीगंज मतदारसंघाचे आमदार आहेत धीरज ओझा...धीरज ओझा प्रतापगड जिल्ह्यातील राणीगंज येथील भाजपाचे आमदार आहेत. जेव्हा आमदार गोंधळ घातला होते, तेव्हा घटनास्थळी पोलिसांची उपस्थिती देखील दिसून येते. व्हिडिओमध्ये आमदार धीरज ओझा जोरात ओरडताना दिसत आहेत.

भाजपाचे आमदार धीरज ओझा यांनी जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले. तसेच, आमदारांनी जमिनीवर पडून गोंधळ घातला. तसेच, मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप या भाजपाच्या आमदाराने केला. फाटलेल्या कपड्यांमध्ये ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आले.

दरम्यान, मतदार यादीमध्ये नाव जोडण्यासाठी भाजपाचे आमदार जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर आंदोलन करत होते. यावेळी निवासस्थानाजवळ जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकक्षक उपस्थित होते. हे प्रकरण प्रतापगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे आहे.

नितीन राऊतांचा योगी आदित्यनाथांवर निशाणाकाँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपा आमदार धीरज ओझा यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. "ही सामान्य व्यक्ती नसून यूपीचे भाजपाचे आमदार धीरज ओझा आहेत. डीएमकडे तक्रार घेऊन गेले असता एसपींनी त्यांना मारहाण केली की, त्यांच्या शरीरावर कपडा शिल्लक राहिला नाही. यूपीमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरु आहे, असे आदित्यनाथ सांगतात. काय हे देखील चांगले आहे?" असा सवाल नितीत राऊत यांनी ट्विटद्वारे केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाNitin Rautनितीन राऊत