शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:19 IST

Dinesh Pratap Singh: संपूर्ण गांधी कुटुंबाला 'पलायनवादी' असं म्हणत खुले आव्हानही दिनेश प्रताप सिंह यांनी दिले आहे.

Dinesh Pratap Singh:काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. यावरून उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) दिनेश प्रताप सिंह यांनी प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, संपूर्ण गांधी कुटुंबाला 'पलायनवादी' असं म्हणत खुले आव्हानही दिनेश प्रताप सिंह यांनी दिले आहे.

"मी या सर्व गांधींना रायबरेलीमध्ये आमंत्रित करतो, जेव्हा त्यांना वाटेल, तेव्हा पंजाचे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझ्याविरोधात निवडणूक लढवावी आणि तीन लाख मते मिळवावी. मी राजकारणातून संन्यास घेईन", असे दिनेश सिंह यांनी एका खुल्या पत्राद्वारे गांधी कुटुंबाला आव्हान दिले आहे. 

राज्यमंत्र्यांनी गुरुवारी एक पत्र जारी करून म्हटले आहे की, माझ्यासाठी भारतीय संस्कार आणि संस्कृती असलेली भारतातील प्रत्येक महिला माता भगवती सारखी आहे, परंतु मी प्रियांका गांधी यांचे राहणीमान, आचरण, खाण्याच्या सवयी वगैरे मला भारतीय संस्कृतीला अनुसरून वाटत नाहीत. तसेच, प्रियांका गांधी या केवळ पराभवाच्या भीतीने रायबरेलीतून निवडणूक लढवत नाहीत. हे जरी खरे असले तरी, त्या केवळ वायनाडमधूनच निवडणूक का लढवणार आहेत? कोणाला होणारा विरोध त्यांना वायनाडला घेऊन जात आहे, हे काचेप्रमाणे स्पष्ट आहे. त्यामुळे असा सवाल उपस्थित होत आहे. 

याचबरोबर, 'गांधी' कुटुंब पलायनवादी आहेत, हे खरं आहे. जोपर्यंत सोनिया गांधींना अमेठी आणि रायबरेलीतून अन्नधान्याचा पुरवठा होत होता, तोपर्यंत त्या अमेठी आणि रायबरेलीतच राहिल्या, जेव्हा त्यांना पराभव दिसून येत होता, तेव्हा त्या राजस्थानला पळून गेल्या. तसेच, राहुल गांधी आधी अमेठी सोडून वायनाडल गेले, त्यानंतर त्यांनी रायबरेलीसाठी वायनाड सोडले आणि आता प्रियांका गांधी आपले घर, सासर, रायबरेली, अमेठी सोडून वायनाडला जात आहेत. त्याचप्रमाणे हरल्यानंतर इंदिरा गांधीही रायबरेली सोडून मेडकला (आंध्र प्रदेश) गेल्या होत्या, त्यामुळे असा सवाल उपस्थित होत आहे, असे दिनेश प्रताप सिंह यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस