शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

...तर पुढील वर्षीच मोदी सरकारला जोरदार धक्का; एक निवडणूक ठरणार हुकूमाचा एक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 18:41 IST

विरोधकांचं बैठकांचं सत्र सुरू; निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर गांधी कुटुंबाच्या भेटीला; शरद पवारदेखील सक्रीय

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी भाजपला मोठा झटका देण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केल्याचं दिसत आहे. त्यासाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी कालच गांधी कुटुंबाची भेट घेतली. त्याआधी महिन्याभरात ते तीनदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार विरोधकांचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली. मात्र खुद्द शरद पवारांनी आपण राष्ट्रपतीपदासाठी उत्सुक नसल्याचं सांगितलं आहे.

एखाद्या निवडणुकीत विजयी होण्याची खात्री नसेल तर ती निवडणूक शरद पवार लढत नाहीत, असं म्हटलं जातं. त्यामुळेच राष्ट्रपतीपदाची निवडणूक विरोधकांसाठी अधिक आव्हानात्मक असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आमदार, खासदारांची मतं विचारात घेतली जातात. त्यातही प्रत्येक राज्यातील आमदार, खासदारांच्या मतांचं मूल्य वेगळं असतं. हे मूल्य लोकसंख्येनुसार ठरतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का द्यायचं असल्यास उत्तर प्रदेशची निवडणूक हुकूमाचा एक्का ठरू शकते.राष्ट्रपती पदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दलही स्पष्टच बोलले

मतांचं गणित नेमकं काय?राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण १० लाख ९८ हजार ९०३ मतं आहेत. निवडणूक जिंकण्यासाठीचा जादुई आकडा ५ लाख ४९ हजार ४५२ इतका आहे. सध्या भाजपकडे ४ लाख ७४ हजार मतं आहेत. उर्वरित मतांसाठी भाजपला मित्रपक्षांची गरज लागेल. त्यासाठी बिजू जनता दल, एआयडीएमके, टीआरएस, वायएसआर काँग्रेस भाजपला मदत करू शकतात. तशी मदत या पक्षांनी याआधी मोदी सरकारला केली आहे.

उत्तर प्रदेशातील निवडणूक चित्र बदलणार?२०२२ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होईल. गेल्या निवडणुकीत भाजपनं राज्यात तीनशेहून अधिक जागा जिंकल्या. पुढील वर्षी निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक असेल. लोकसंख्या जास्त असल्यानं उत्तर प्रदेशातील आमदारांचं मूल्य अधिक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला नुकसान सहन करावं लागल्यास त्याचा परिणाम राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिसेल.

शिवसेना आणि मित्रपक्षांची साथ सोडल्याचा काय परिणाम?शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल या दोन जुन्या मित्रपक्षांनी भाजपची साथ सोडली आहे. गेल्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष भाजपसोबत होते. २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना ६५ टक्के मतं मिळाली. यातील ४० टक्के मतं भाजपची होती. शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांची संख्या लक्षात घेता निवडणुकीतील त्यांच्या मतांचा प्रभाव दोन ते अडीच टक्क्यांच्या आसपास आहे. अकाली दलाचीही स्थिती सारखीच आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPrashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेस