शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 06:53 IST

योगी आदित्यनाथ सरकारच्या एका मंत्र्याचा गौप्यस्फोट

- शीलेश शर्मानवी दिल्ली :  सात महिन्यांनंतर होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये एका  मोठ्या बंडाची तयारी होत आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार विद्यमान १२६ आमदार भाजपशी फारकत घेऊन दुसऱ्या पक्षात सामील होण्याच्या बेतात आहेत, असा गौप्यस्फोट योगी आदित्यनाथ सरकारच्या एका मंत्र्याने ‘लोकमत’शी बोलताना केला.सरकारमध्ये मंत्री आणि आमदारांचे काहीही ऐकून घेतले जात नाही. तसेच त्यांना महत्त्वही दिले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणांवर नाराजी आहे.काही दिवसांपूर्वीच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामार्फत राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी अन्य सदस्यांसोबत योगी आदित्यनाथ सरकारच्या स्थितीचे आकलन केल्यानंतर दावा केला होता की, सर्व काही ठीक आहे. नेतृत्वात बदल होणार नाही. कारण आम्ही मंत्री आणि आमदारांशी चर्चा केलेली आहे.परंतु  मंत्री बृजेश पाठक यांनी सांगितले की, बी. एल. संतोष आणि अन्य केंद्रीय नेत्यांनी लखनौत बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला.  आमदारांशी थेट संवाद साधण्यात आला नाही. या बैठकीत फक्त कोरोना स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवरच चर्चा झाली. बंडाचे निशाणभाजपचे आ. राकेश राठोड यांनी  सरकारविरुद्ध याआधीच बंडखोरीचे निशाण फडकावले आहे.  त्यांचा आरोप आहे की, सरकारच्या लेखी आमदारांना महत्त्वच नाही. कोणी बोलले, तर कायद्याचा बडगा उगारून त्याची बोलती बंद केली जाते. त्यांचा  स्पष्ट दृष्टिकोन बघता ते भाजपविरुद्ध बंड करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे संकेत मिळतात.फिरोजाबादचे आ. राम गोपाल लोधी यांच्यासह दुसरे आमदारही भाजपविरोधी भूमिका घेत निवडणुकीआधी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत दिसतात.सूत्रानुसार अशा सर्व आमदारांवर बसपा आणि समाजवादी पार्टी लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश