शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लॅन! मिशन 2024 साठी '60-70' फॉर्म्युला तयार, अशी असेल रणनीती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 16:17 IST

Loksabha Election 2024 : भाजप अल्पसंख्याकबहुल लोकसभा मतदारसंघात स्कूटर यात्रा काढणार आहे.

नवी दिल्ली :  2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) सर्वच पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. यातच भाजपने अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी एक मेगा मास्टर प्लॅन बनवला आहे. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि बौद्ध यांच्यापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम राबवणार आहे. 

इतकेच नाही तर भाजप अल्पसंख्याकबहुल लोकसभा मतदारसंघात स्कूटर यात्रा काढणार आहे. दिल्लीत होणाऱ्या अल्पसंख्याकांच्या परिषदेसाठी भाजपचीही मोठी योजना असून या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करू शकतात, असे म्हटले जात आहे. भाजपच्या सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजप आपल्या स्कूटर यात्रेत मुस्लिम धर्मगुरूंचाही समावेश करू शकतो, याबाबतच्या रणनीतीवर पक्षात चर्चा होत आहे. 

भाजपच्या प्लॅननुसार, भाजप प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 5000 मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना पक्षाशी जोडेल. तसेच, मुस्लिम धर्मगुरूंना जोडून भाजप केंद्र सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांचा प्रचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात आउटरीच कार्यक्रम आयोजित केल्यानंतर भाजप अल्पसंख्याक स्नेहसंमेलन आयोजित करणार आहे.

भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीसाठी 60-70 लोकसभा मतदारसंघ आधीच अधोरेखित केले आहेत, असे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, या सर्व अल्पसंख्याक बहुल लोकसभेच्या जागा आहेत, जेथे अल्पसंख्याक समुदाय बहुसंख्य प्रमाणात आहे. प्लॅननुसार, भाजप 60-70 लोकसभा मतदारसंघात सुफी, सुशिक्षित मुस्लिम, डॉक्टर, इंजिनियर, विणकर, कारागीर, छोटे व्यापारी यांच्यात आपली पकड निर्माण करेल आणि त्यांना पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

याचबरोबर, प्लॅननुसार लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप अल्पसंख्याक लोकसभा मतदारसंघात बूथ व्हेरिफिकेशन आणि पन्ना समिती व्हेरिफिकेशनचे काम लवकरच सुरू करणार आहे. तसेच, भाजप या वर्षी एप्रिल/मे महिन्यात दिल्लीत मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांचे मोठे अधिवेशन घेणार आहे. त्यासाठी पक्षातर्फे दिल्लीत 3 लाख अल्पसंख्याकांची परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीत होणाऱ्या अल्पसंख्याक परिषदेला संबोधित करण्याची योजना आहे.

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा