शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election: समान नागरी कायदा, गरीब कुटुंबांना मोफत दूध व गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन; कर्नाटकात भाजपचा जाहीरनामा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 12:47 IST

Karnataka Election : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, सीएम बसर्वज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

बंगळुरू : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यापासून गरीब कुटुंबांना मोफत दूध देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, सीएम बसर्वज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये 7 'A' म्हणजेच अण्णा, अक्षरा, आरोग्य, अभिवृद्धी, अदाया आणि अभाया यांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी, कर्नाटकसाठी जाहीरनामा एसी रूममध्ये बसून बनवला गेला नाही, तर त्यासाठी चांगली मेहनत करण्यात आली आहे. या जाहीरनाम्यासाठी कठोर परिश्रम घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन भेट दिली. तेथे त्यांनी लाखो कुटुंबांशी संपर्क साधला आणि सूचना प्राप्त केल्या, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले. यासोबतच त्यांनी आधीच्या काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत म्हटले की, "सिद्धरामय्या यांचे सरकार पूर्णपणे रिव्हर्स गियर असलेले सरकार होते. त्यांच्या सरकारने नैसर्गिक साधनसंपत्ती लुटली आहे. गुन्हेगारी आणि समाजकंटकांना मोकळे फिरू दिले आहे आणि आपली मतपेढी मजबूत करण्यासाठी समाजातील एका वर्गाला खूश केले आहे."

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपची प्रमुख आश्वासने...- उगादी, गणेश चतुर्थी आणि दीपावलीनिमित्त बीपीएल कार्डधारकांना वर्षभरात तीन गॅस सिलिंडर मोफत.- गरीब कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध मोफत- प्रत्येक गरीब कुटुंबाला 5 किलो तांदळासोबत आता 5 किलो बाजरीही मोफत दिली जाणार.- शहरातील गरिबांसाठी पाच लाख घरे बांधली जाणार.- मोफत भोजनासाठी अटल आहार केंद्र सुरू करण्यात येणार.- एससी-एसटी महिलांना पाच वर्षांसाठी 10,000 रुपयांची एफडी दिली जाईल.- 30 लाख महिलांना मोफत बस पास देण्यात येणार.

- देव यात्रा तिरुपती, अयोध्या, काशी, रामेश्वरम, कोल्हापूर, सबरीमाला आणि केदारनाथ येथे जाण्यासाठी गरीब कुटुंबांना एकावेळी 25000 रुपयांची मदत केली जाईल.-  मंदिरांच्या प्रशासनाला पूर्ण स्वायत्तता देण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल.-  बंगळुरूमध्ये राज्य राजधानी क्षेत्र स्थापन केले जाईल.- वोक्कालिंगा आणि लिंगायत यांच्या आरक्षणात प्रत्येकी दोन टक्क्यांनी वाढ केली जाईल.- बेट्टा कुरबा, सिद्दी, तलवाडा आणि परिवरा समाजाचा आदिवासींच्या यादीत समावेश केला जाईल.- पीएफआय आणि इतर जिहादी संघटनांवर बंदी घालण्यात आली.- कर्नाटकमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात येणार.- बेकायदेशीर निर्वासितांना हद्दपार केले जाईल.

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक