शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भाजपाने गुजरात थोडक्यात राखले, मोदी जिंकूनही राहुल बाजीगर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 3:44 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत.

अहमदाबाद/सिमला/नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरातजिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसचे पानिपतच झाले. तेथील ६८ जागांपैकी ४४ जागा जिंकून देशातील आणखी एक राज्य भाजपाने आपल्याकडे खेचले आहे. देशातील १३ राज्यांत आता भाजपाची स्वबळावर सत्ता असेल. महाराष्ट्र, बिहार व जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांसमवेत भाजपा सत्तेवर असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे १६ राज्ये आहेत. हे घवघवीत यश मिळवताना मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. पक्षासाठी हा मोठा धक्का असून, तिथे पक्षाला नवा नेता शोधावा लागणार आहे.पंतप्रधान मोदी म्हणाले...परिश्रमाचा विजय-मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना जो विकास केला त्याचे तेच चक्र माझ्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू ठेवले. कठोर परिश्रम केलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. हा विजय सामान्य विजय नाही. तेथील विकासाचा प्रवास पुढे सुरू ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करू व लोकांची अथक सेवा करू.राहुल गांधींचा असाही उदय-गुजरात या मोदी यांच्या बालेकिल्ल्यावरच राहुल गांधी यांनी घाव घातला. दलित, अल्पसंख्याक, शेतकरी, व्यापारी आणि बेरोजगार तरुणांसाठी त्यांनी आवाज उठवला. सोशल मीडियावर मोदी व अमित शहा यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीही केली. विकासाच्या मुद्द्यावर बोलतीच बंद केली. यामुळेच भाजपा शंभरीही गाठू शकली नाही. अन् काँग्रेस पराभूत होऊनही राहुल गांधी बाजीगर ठरले.राहुल गांधी म्हणाले...लोकांचा कौल मान्य-मी व माझा पक्ष लोकांनी दिलेला कौल मान्य करतो. दोन्ही राज्यांतील नव्या सरकारांचे अभिनंदन. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतिस्पर्धी पक्षावर अतिशय संयमाने व सन्मानाने टीका केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काँग्रेसने प्रचारात कुठेही पातळी घसरू दिली नाही; किंबहुना विकासाचे मुद्दे मांडून सत्ताधा-यांची अडचण केली. असेच राजकारण पुढेही करायचे आहे.अमित शहा म्हणाले...लोकप्रियतेचा विजय-अमित शहा म्हणाले, भाजपाच्या बाजूने आलेले हे निकाल म्हणजे घराणेशाहीविरुद्ध विकास आणि उत्कृष्ट कामगिरीचा हा विजय आहे. गुजरातमधील विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणाच्या कामांना आहे. जातीयवाद आणि तुष्टीकरणाच्या विरुद्ध लोकांचा कौल आहे.सत्तास्थापनेची भाजपाची तयारी-भाजपाने गुजरात आणि हिमाचल प्रदेशात सत्ता स्थापन करण्याची तयारी चालविली असून गुजरातसाठी अर्थमंत्री अरुण जेटली आणि महासचिव सरोज पांडे यांची तर, हिमाचल प्रदेशसाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण व केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातसाठी विजय रुपाणी यांचीच निवड जवळपास निश्चित आहे.आठ निवडणुका भाजपासाठी कठीण-गुजरात आणि हिमाचलमध्ये सत्ता मिळवण्यात यश आले असले तरी गुजरातमध्ये काँग्रेसने केलेली दमछाक बघता पुढील वर्षी आठ राज्यांमध्ये होणाºया निवडणुकांमध्ये भाजपाला कसरत करावी लागेल.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी