शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संघटनेत मोठे बदल, नवीन अजेंडा; 2024 साठी भाजपने तयार केला 'इस्ट-नॉर्थ-साउथ' मेगा प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 13:39 IST

BJP Lok Sabha Election: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे.

BJP Lok Sabha Election: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातून भाजपच्या 'मेरा बूथ, सबसे मजबूत' अभियानाची सुरुवात केली होती. 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाने आता मायक्रो मॅनेजमेंटच्या रणनीतीवर काम सुरू केले आहे.

तीन विभागात विभागणी

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने मायक्रो मॅनेजमेंटसाठी मेगा प्लॅन तयार केला आहे. पक्षाचे कामकाज सुलभ करण्यासाठी भाजपने देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची पूर्व, उत्तर आणि दक्षिण, अशा तीन विभागांमध्ये विभागणी केली आहे. भाजप अध्यक्ष प्रत्येक क्षेत्रातील प्रमुख नेते आणि संघटना मंत्र्यांची बैठक घेणार आहेत.

बुधवारी मोदींची मॅरेथॉन बैठक

भाजपच्या या मेगा प्लॅनची ​​ब्लू प्रिंट गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) आणि संघटन मंत्री बीएल संतोष (BL Santosh) यांच्या बैठकीच्या तीन फेऱ्यांमध्ये तयार करण्यात आली आहे. बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही मॅरेथॉन बैठक झाली. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत पक्षाच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण योजनांवर चर्चा करण्यात आली. भाजप संघटनेत बदलासोबतच निवडणुकीबाबत नव्या रणनीतीची चर्चाही जोर धरू लागली आहे.

तळागळात योजनांची माहिती द्या...

पुढची निवडणूक मागास, दलित, वंचित आणि शोषित वर्गाच्या प्रश्नावर लढली जाईल, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या मंत्र्यांना दिला आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या भागात जाऊन या घटकांपर्यंत पोहोचून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती द्यावी. जो पात्र आहे आणि ज्याला कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्याला संबंधित योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

नड्डा 6,7 आणि 8 जुलै रोजी बैठक घेणार 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा 6 जुलैला पूर्व सेक्टर, 7 जुलैला नॉर्थ सेक्टर आणि 8 जुलैला साऊथ सेक्टरच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. पूर्व विभागाची बैठक गुवाहाटी, उत्तरेची दिल्ली आणि दक्षिणेची बैठक हैदराबादमध्ये होणार आहे. या बैठकीला भाजप अध्यक्षांसह प्रदेशाध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटनमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डाlok sabhaलोकसभा