शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भाजपामध्ये बंडखोरीची शक्यता, पटेल नेतेही काँग्रेसवर नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 4:01 AM

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पटेल, दलित व ओबीसींना आपल्या बाजूने एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी पटेल समाजात अद्याप नाराजी आहे

हरीश गुप्ता / महेश खरे नवी दिल्ली/ अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पटेल, दलित व ओबीसींना आपल्या बाजूने एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी पटेल समाजात अद्याप नाराजी आहे, तर अनेक मंत्री व आमदारांना नाकारून काँग्रेस नेत्यांना उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये असंतोष आहे. काँग्रेसने नाकारल्याने राष्ट्रवादीची तिथे स्वतंत्र चूल आहे आणि दुसरीकडे शिवसेनाही रिंगणात आहे. त्यामुळे तेथील राजकारणात रंग भरू लागला आहे.काँग्रेसला ९ डिसेंबर रोजी होणाºया मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ७७ उमेदवारांच्या यादीत पटेल समाजाला प्रतिनिधित्व दिले असले तरी पाटीदार अनामत समिती नाराज आहे. त्यांनी २० जागांची मागणी केली होती आणि यादीत त्यांच्या २ जणांची नावे आहेत.ही यादी जाहीर झाल्यानंतर पाटीदार समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री सूरतमध्ये काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. या समितीचे संयोजक अल्पेश कथिरिया म्हणाले की, काँग्रेसने विश्वासात न घेता आमच्या दोन उमेदवारांना तिकीट दिले आहे. त्यांनी यादीत ज्या अन्य पटेल उमेदवारांचा समावेश केला आहे, ते बोगस आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करणार आहोत.पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र व दक्षिण गुजरातच्या ८९ मतदारसंघांत मतदान होणार आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांना पोरबंदमधून, माजी विरोधी पक्षनेते शक्तिकांत गोहिल यांना मांडवीतून व विद्यमान आ. इंद्रनील राज्यगुरू यांना मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याविरुद्ध राजकोट पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. हार्दिक पटेल यांच्या पाटीदार समितीच्या ज्या दोन जणांना तिकीट देण्यात आले आहे, त्यात धोराजीतून ललित वासोया व जुनागढमधून अमित थुम्मर यांचा समावेश आहे.>राष्ट्रवादी स्वतंत्र लढणारकाँग्रेस व राष्ट्रवादीच्या गुजरातमधील १० वर्षांच्या आघाडीतही बिघाड झाला आहे. काँग्रेस नेतृत्वाने आपण हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवानी यांच्याशी चर्चेत व्यग्र असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळवले. त्यामुळे नाराज प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचा पक्ष १८२ जागा लढवेल आणि उमेदवारांची घोषणा उद्यापर्यंत होईल, असे सांगितले.या घडामोडींना अलीकडील संदर्भ आहेत. काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नव्हता. राष्ट्रवादीच्या दोनपैकी एका सदस्याने अहमद पटेल यांचे समर्थन केले, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. शरद पवार यांनी राहुल गांधी यांची स्तुती केल्याने सर्व सुरळीत असल्याचे मानले जात होते. पण तसे चित्र गुजरातेत दिसत नाही. मात्र विरोधकांच्या १८ पक्षांच्या आघाडीत या दोन पक्षांचा समावेश आहे.काँग्रेससाठी पाटीदार समुदाय जमेची बाजूभाजपापासून दूर झालेला पाटीदार समाज काँग्रेस व मित्र पक्षांकडे गेला आहे. काँगे्रससाठी ही जमेची बाजू आहे. आरक्षण आंदोलनात याच समुदायाने सत्तेचे सिंहासन हलविले व आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले.भाजपाने यंदा ३२ आमदारांना तिकीट नाकारून काँग्रेसमधून आलेल्यांना स्थान दिले आहे. शिवसेनाही स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना ६० ते ७० जागांवर लढणार आहे. त्यामुळे भाजपावर याचा परिणाम होऊ शकतो. तर, राष्ट्रवादीच्या उमेदवारांमुळे काँग्रेसवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.>भाजपाने ३ मंत्र्यांसह१६ आमदारांना वगळलेभाजपाने तिसºया यादीत ३ मंत्र्यांसह १६ आमदारांना तिकीट नाकारले. जयंती कवडिया, वल्लभ वाघासिया व नानू वानानी या मंत्र्यांना वगळले आहे. आ. जेठा सोळंकी यांना वगळल्यानंतर त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. भाजपा सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. आ. वसुबेन त्रिवेदी यांनाही उमेदवारी नाकारली आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आर. सी. फाल्दू यांना उमेदवारी मिळाली.>रूपाणींचा अर्ज दाखल; नांदेडचा बँड-बाजामुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते म्हणाले की, काँग्रेसने तीन प्रमुख संघटनांच्या नेत्यांना ‘आउटसोर्स’ केले आहे. त्यांच्याकडे स्वत:चे काहीही नाही. नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरात नव्या उंचीवर जाईल. रूपाणी यांनी अर्ज भरला तेव्हा नांदेडहून बँड-बाजा बोलावला होता.>हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेशहार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवाणी हे क्रमश: पाटीदार, ओबीसी आणि दलित समाजाचे नेते यंदा काँग्रेससोबत आहेत. गुजरातमध्ये पाटीदार २० टक्के, ओबीसी ५१ टक्के व दलित समाज १० टक्के आहे. काँग्रेसचे तिकीटवाटप सुरळीत झाल्यास भाजपासाठी ते आव्हान असेल. मोदी यांची जादू काँग्रेस कशी रोखणार, ते येणारा काळच सांगणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीhardik patelहार्दिक पटेल