मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला आघाडी
By बाळकृष्ण परब | Updated: November 10, 2020 10:28 IST2020-11-10T10:26:16+5:302020-11-10T10:28:48+5:30
bypoll result news : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने आघाडी मिळवली आहे.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला आघाडी
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निडणुकीप्रमाणेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने आघाडी मिळवली आहे.
मध्य प्रदेशमध्ये २८ जागांवर पोटनिवडणूक होत असून, येथील २२ मतदारसंघांमधील कल समोर आले आहेत. यामध्ये भाजपाने १८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर८ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे इतर पक्ष दोन जागांवर आघाडीवर. मध्य प्रदेशमध्ये सरकार टिकवण्यासाठी भाजपाला किमान ९ ते १० जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला २८ पैकी २८ जागा जिंकणे आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशमध्येही ७ जागांवर पोटनिवडणूक झाली होती तिची मतमोजणी सुरू असून, यामध्ये भाजपा ४ आणि सपा बसपा प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. गुजरातमध्ये आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सात जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर एका जागेवर काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.
इतर राज्यांच्या विचार केल्यास कर्नाटकमध्ये दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर जागेवर भाजपा आघाडीवर आहे. झारखंडमध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होत असून, येथील मतमोजणीत एका ठिकाणी भाजपा आणि एका ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे.