उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे नेते संघस्थानी; सरकार्यवाहांच्या उपस्थितीत बैठक

By योगेश पांडे | Updated: August 28, 2022 12:42 IST2022-08-28T12:41:57+5:302022-08-28T12:42:41+5:30

विशेष म्हणजे राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच भाजपचे नेते एकत्रितपणे संघस्थानी पोहोचले आहेत.

BJP leaders and Deputy Chief Minister Devendra Fadnavis meeting with RSS in Nagpur | उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे नेते संघस्थानी; सरकार्यवाहांच्या उपस्थितीत बैठक

उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे नेते संघस्थानी; सरकार्यवाहांच्या उपस्थितीत बैठक

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात दाखल झाले. संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकीत उपस्थित राहण्यासाठी हे नेते पोहोचले. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. 

विशेष म्हणजे राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच भाजपचे नेते एकत्रितपणे संघस्थानी पोहोचले आहेत. सकाळी ११ च्या सुमारास सुरू झालेल्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रामुख्याने सहभागी झाले आहेत. संघातर्फे नियमितपणे विविध संघटनांची समन्वय बैठक आयोजित करण्यात येते. 

त्यात संघटनांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात येतो व पुढील योजनांबाबत चर्चा होते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या बैठकीला महत्त्व आले आहेत. विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी सरकारकडून असलेल्या अपेक्षादेखील व्यक्त करतील.

Web Title: BJP leaders and Deputy Chief Minister Devendra Fadnavis meeting with RSS in Nagpur