शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

"यह डर अच्छा लगा...! प्रतीक्षा करा, कॉलचा पुरावाही देणार"; सुवेंदूंनी ममतांना वेळही सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 01:10 IST

"ही भीती मला चांगली वाटली, आपण त्यांनी (ममता बॅनर्जी) फोन कसा केला होता याचे पुरावेही देणार आहोत, असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे."

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमाने हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या एका विधानानंतर अधिकारी यांनी ममतांवर हा निशाणा साधला. "तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता, हे सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ," असे ममतांनी सुवेंदू यांचा दावा फेटाळत म्हटले होते. यावर आता पुन्हा एकदा, "ही भीती मला चांगली वाटली, आपण त्यांनी (ममता बॅनर्जी) फोन कसा केला होता याचे पुरावेही देणार आहोत, असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे."

भ्रष्टाचाराच्या पोळाची राणी मधमाशी -सुवेंदू अधिकारी म्हणाले, हे अत्यंत लज्जास्पद आहे की, आपण माझ्यासाठीही तोच "किंभूत किमाकर" शब्द वापरला, जो यापूर्वी पंतप्रधानांसाठीही वापरला होता. राहिला प्रश्न दिल्लीला फोन करण्याचा, तर आपण त्यासाठी लँडलाईन फोनचा वापर केला होता. आपण लवकरच हे एक्सपोज करू. माझ्या अचूक उत्तरासाठी उद्याची वाट बघा. एवढेच नाही, तर ममता यांना भ्रष्टाचाराच्या पोळाची राणी मधमाशी म्हणत, आपल्या सर्व आमदारांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होत आहे. आणि आपण त्यांचा बचाव करत आहात," असेही सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.

यापूर्वी सुवेंदू यांनी केला होता असा दावा - तत्पूर्वी, सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी दावा केला होता की, निवडणूक आयोगाने टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर, बॅनर्जी यांनी अमित शाह यांना फोन करून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यानी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते (भाजप) 200 हून अधिक जागा जिंकू शकणार नाहीत, असे म्हटले होते.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाAmit Shahअमित शाह