शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात भीती, अनिल देशमुखांवर कारवाई केली तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 16:04 IST

Param Bir Singh Letter: या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी लोकसभेतही यावर गदारोळ झाला. भाजपकडून नवनवीन गोष्टींचे दावे आणि खुलासे करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देपरमबीर सिंग पत्र प्रकरणाचे देशभरात पडसादपरमबीर सिंग पत्र प्रकरणावर भाजपचे नवे दावेदेवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांना भेटणार

नवी दिल्ली :सचिन वाझे प्रकरण, (Sachin Vaze Case) परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेले पत्र (Param Bir Singh Letter) या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी लोकसभेतही यावर गदारोळ झाला. भाजपकडून नवनवीन गोष्टींचे दावे आणि खुलासे करण्यात येत आहेत. अशातच भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी आता नवा धक्कादायक दावा केला आहे. (bjp leader sushil kumar modi react on param bir singh letter) 

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर व धक्कादायक आरोप केले आहेत. तसेच परमबीर सिंग यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. १३० पानी याचिकेत परमबीर सिंग यांनी आणखीन नवे दावे केले आहेत. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर नवनवीन दावे, खुलासे होऊनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर एक चकार शब्दही बोललेले नाहीत, यावरूनही विरोधकांनी टीका केली आहे. सुशील कुमार मोदी यांनीही याच मुद्द्यावरून मोठा दावा केला आहे. 

काय म्हणतात सुशील कुमार मोदी?

अराजकता पसरल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.  संपूर्ण महाविकास आघाडी सरकार अनिल देशमुख यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली, तर ते अशी एखादी गोष्ट बोलतील, ज्यामुळे संपूर्ण सरकार अडचणीत येईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे, असा दावा मोदी यांनी केला आहे. 

अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला

देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांना भेटणार

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंग प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. पोलीस खात्यांमधील बदल्यासंदर्भातील घोटाळ्याचे पुरावे असतानाही कोणतीही कारवाई मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी केली नाही, असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी आता हे सर्व पुरावे केंद्रीय गृह सचिवांकडे देऊन CBI चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. 

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुख