देशात कृषी कायद्यांविरोधात महिन्याभरापासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या परदेशी रवाना झाले आहेत. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी वैयक्तीक कारणांमुळे परदेशात गेले असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपानं त्यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या या परदेश दौऱ्यावर निशाणा साधला आहे. "शेतकरी म्हणतात राहुल बाबांना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु राहुल बाबांना आजीची आठवण आली," असं म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींवर टीका केली. यापूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला होता.
सुब्रमण्यम स्वामींचा राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले, "शेतकरी आंदोलनासाठी बोलावत होते पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 16:59 IST
Subramanian Swamy : राहुल गांधींच्या इटली दौऱ्यावरून सुब्रमण्यम स्वामींची टीका
सुब्रमण्यम स्वामींचा राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले, शेतकरी आंदोलनासाठी बोलावत होते पण...
ठळक मुद्देराहुल बाबांना आजीची आठवण आली, सुब्रमण्यम स्वामींचा हल्लाबोल