शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात फिर एक बार भाजपा सरकार; शिवराज सिंह चौहान यांचा शपथविधी संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 21:44 IST

शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री; राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न

भोपाळ: मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुललं आहे. जवळपास महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर आज भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काही वेळापूर्वीच त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती. राजभवनात शिवराज यांचा शपथविधी संपन्न झाला. त्यांनी चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. थोड्याच वेळापूर्वी भाजपा आमदारांची बैठक पार पाडली. त्यात चौहान यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. मध्य प्रदेशच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन, अशी भावना त्यांनी यानंतर व्यक्त केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं प्रमुख आव्हान सध्या राज्यासमोर आहे. त्यामुळे याच विषयाला प्राधान्य देण्यात येईल. शपथविधी सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा जल्लोष करू नये. रस्त्यावर न उतरता घरातच थांबावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं.काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. यातील २५ जागा सध्या रिक्त आहेत. सध्या विधानसभेत एकूण २०५ आमदार आहेत. यापैकी १०६ आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत आहे. येत्या काही दिवसांमध्ये रिक्त असलेल्या २५ जागांसाठी पोटनिवडणूक होईल. ही निवडणूक भाजपा आणि काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची असेल.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान