शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच - रेणुका शहाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 15:51 IST

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एम.जे.अकबर यांच्यावर टीका केली आहे. 'तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच' असा टोला रेणुका यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देभाजपाच्या MainBhiChowkidar मोहिमेला माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी देखील पाठिंबा दिला. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी यावरून एम.जे.अकबर यांच्यावर टीका केली आहे.  'तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच' असा टोला रेणुका यांनी लगावला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये चौकीदार चोर है असं कॅम्पेन उघडलं होतं. मात्र आता याच कॅम्पेनला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून #MainBhiChowkidar  या कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी, मोठ्या नेत्यांनी तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील 'चौकीदार अमित शाह' असे नाव ठेवले आहे. भाजपाच्या या मोहिमेला माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी देखील पाठिंबा दिला. मात्र अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी यावरून एम.जे.अकबर यांच्यावर टीका केली आहे. 'तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच' असा टोला रेणुका यांनी लगावला आहे.

एम. जे. अकबर यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मै भी चौकीदार या मोहिमेला पाठिंबा देताना मला अभिमान वाटत आहे. भारताचा नागरिक म्हणून मी देशांतील भ्रष्ट्राचार, दहशतवाद, गरिबी दूर करण्यासाठी आणि एक नवा भारत घडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेल' असं ट्वीट करत या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एम. जे. अकबर यांचं ट्वीट रिट्वीट करत तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच असतील असं म्हणत टीका केली आहे. 

एम.जे. अकबर यांच्यावर अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एम.जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुभा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या आहेत. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली काम केले होते.

पंतप्रधान मोदींसह भाजपचे सर्वच नेते झाले "चौकीदार"लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मै भी चौकीदार असा प्रमुख उल्लेख करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या घोषणेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं. त्यामध्ये मोदी म्हणाले की, मी देशाची सेवा करण्यासाठी चौकीदार आहे. पण मी एकटा चौकीदार नाही तर भ्रष्टाचाराविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. जो देशाची प्रगती करण्यासाठी मेहनत करतोय, तो चौकीदार आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार आहे असं म्हणत मै भी चौकीदार ही मोहीम ट्वीटरवर सुरू केली आहे. 

टॅग्स :Renuka Shahaneरेणुका शहाणेM J Akbarएम. जे. अकबरBJPभाजपा