भाजप नेत्याची ओडिशात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 03:42 IST2019-04-16T03:42:41+5:302019-04-16T03:42:48+5:30

भारतीय जनता पक्षाचे खुर्दा मंडल प्रमुख मंगुली जेना यांची रविवारी रात्री स्कुटरवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.

BJP leader killed in Odisha | भाजप नेत्याची ओडिशात हत्या

भाजप नेत्याची ओडिशात हत्या

भुवनेश्वर : भारतीय जनता पक्षाचे खुर्दा मंडल प्रमुख मंगुली जेना यांची रविवारी रात्री स्कुटरवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या मारेकऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी रात्री जेना खुर्दा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कालू खंडायत्रय यांच्याशी चर्चा करीत असताना, दोघे जण स्कुटरवरून तेथे आले. त्यातील एकाने पिस्तुलातून तीन गोळ्या जेना यांच्यावर झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या जेना यांना लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून ओडिशातील ही दुसरी राजकीय हत्या आहे. पोलीस या गोळीबाराचा तपास करीत आहेत.

Web Title: BJP leader killed in Odisha