शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रेषित अवमानप्रकरण: भाजप नेत्याला कानपूरमध्ये अटक; आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 08:44 IST

नुपूर शर्मा यांना भाजपमधून पाठिंबा वाढत असून, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एका भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे.

कानपूर: भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अपमानकारक विधानाचे देशासह जगभरातील इस्लामी देशांत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. देशाची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप विरोधक करत असतानाच आता भाजपच्या एका नेत्याला कानपूरमधून अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजपकडून नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला जात असून, या प्रकरणी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करण्याचा आरोप या भाजप नेत्यावर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव हर्षित श्रीवास्तव असून, भाजपच्या फ्रंटल संघटनेच्या युवा मोर्चाचा तो मंत्री आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हर्षित श्रीवास्तव अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य आहे.  हर्षित यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट आक्षेपार्ह असून, त्यात चुकीची टिप्पणी केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती कानपूरचे पोलीस आयुक्त विजय सिंह मीणा यांनी दिली. 

धार्मिक मुद्द्यांवर प्रवक्त्यांसाठी भाजपच्या मार्गदर्शक सूचना 

भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्ष प्रवक्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात विशेषत: धार्मिक भावना दुखावू नयेत, असे निर्देश दिले आहेत. भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी एका विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर इस्लामिक देशांनी भारताविरुद्ध राजकीय स्तरावर विरोध व्यक्त केला. तसेच भारतीय उत्पादनावर बहिष्काराचे आवाहनही केले. त्या पार्श्वभूमीवर भाजपने उपरोक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित 

भाजपच्या एक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानुसार सर्व नेते आणि प्रवक्त्यांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय  प्रसार माध्यम विभागाच्या परवानगीशिवाय निवेदन जारी करु नये. कोणता प्रवक्ता,कोणत्या टीव्ही चॅनलवर पक्षाची बाजू मांडेल, हे भाजपची माध्यम समिती ठरविते. यासाठी त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. 

दरम्यान, निषेध करणाऱ्या आंतरराष्ट्रीय इस्लामी देशांमध्ये दिवसेंदिवस अधिकच भर पडत चालली आहे. कतार, इराण, कुवेतपाठोपाठ आता संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांनाही या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली. यामध्ये सौदी अरेबिया, बहारीन, अफगाणिस्तान, जॉर्डन, ओमान, पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे.  

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशKanpur Policeकानपूर पोलीस