शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

येडियुरप्पांनी केला सरकार स्थापनेचा दावा, आज संध्याकाळी होणार शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 10:53 IST

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी पडल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

बंगळुरू -  कर्नाटकमध्ये कुमारस्वामी पडल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दरम्यान, भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत. या भेटीदरम्यान येडियुरप्पा हे सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, आज संध्याकाळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.  

राज्यपालांची भेट घेऊन येडियुरप्पा त्यांना 105 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र सोपवले, तसेत त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. दरम्यान, येडियुरप्पा हेच भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हे करतील. त्यानंतर आज संध्याकाळी येडियुरप्पा यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्यास भाजप नेते येदियुरप्पा यांना त्यासाठी कसरत करावी लागणार आहेत. भाजप आमदारांपैकी ५६ ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रीपद हवे आहे. त्याशिवाय १५ बंडखोर आमदारांपैकी काही जणांना महत्त्वाची पदे द्यावी लागतील.

कर्नाटक मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह फक्त ३४ मंत्र्यांचा समावेश होऊ शकणार आहे. त्यामुळे भाजप व बंडखोर आमदारांमधील ज्यांना मंत्रीपदे मिळणार नाहीत ते येडीयुरप्पा यांच्यासाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकतात. कर्नाटकात कोणीही सरकार स्थापन केले, तरी ते स्थिर राहू शकणार नाही, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले होते.

 दरम्यान, कर्नाटक विधानसभाध्यक्ष  के. आर. रमेश कुमार यांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले आहे. यामध्ये एका अपक्ष आमदाराचा आणि दोन काँग्रेस आमदारांचा समावेश आहे. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात एकूण १७ आमदारांनी बंड केले होते. या आमदारांनी त्यांचे राजीनामे रमेश कुमार यांच्याकडे सोपवले होते. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळले.    

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा