''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,''असं ट्विट सचिननं केलं होतं. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला एक सल्ला दिला होता. यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. "कृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात. पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं ते 'राष्ट्रवादी' काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नाही," असं म्हणत भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवार यांच्यावर निशाणा साधला.
"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 14:03 IST
रिहानाच्या ट्वीटनंतर सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी केली होती टीका
कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने...
ठळक मुद्देरिहानाच्या ट्वीटनंतर सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी केली होती टीकाइतर विषयांवर बोलताना काळजी घेण्याचा पवारांनी सचिनला दिला होता सल्ला