शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी डायनामाइट लावून उडवले भाजपा नेत्याचे घर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 10:51 IST

 बिहारमधील एका भाजपा नेत्याचे घर नक्षलवाद्यांनी डायनामाइट लावून उडवले आहे.

पाटणा -  बिहारमधील एका भाजपा नेत्याचे घर नक्षलवाद्यांनी डायनामाइट लावून उडवले आहे.  माजी आमदार आणि भाजपा नेते अनुज कुमार सिंह यांच्या घराला नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले. मात्र या स्फोटात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. दरम्यान नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार अनुज कुमार  सिंह यांचे डुमरिया येथे घर आहे. येथे त्यांच्या काकांचे कुटुंबीय आणि एक कामगार राहतो. नक्षलवाद्यांनी या घराला लक्ष्य करताना बुधवारी रात्री 11 च्या सुमारास डायनामाइट लावून हे घर उडवून दिले. तसेच अनुज सिंह यांचे चुलत भाऊ जय सिंह यांना नक्षलवाद्यांनी मारहाण केली. 

 यासंदर्भात एसएसपी राजीव मिश्रा यांनी सांगितले की घटनास्थळावर पोलीस तपास करत आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आळी आहे. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल.  माजी आमदार असलेल्या अनुज सिंह यांना काही दिवसांपासून नक्षलवाद्यांकडून धमक्या देण्यात येत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन नक्षलवाद्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हा स्फोट घडवून आणला. दरम्यान, 2015 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान, नक्षलवाद्यांनी याच प्रकारे स्फोट घडवून जनार्दन राय यांचे घर उद् ध्वस्त केले होते.   

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBiharबिहारBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी