शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 10:53 IST

JMM leader's Manoj Pandey : मनोज पांडे म्हणाले की, निवडणूक आज जाहीर होणार आहे, मात्र त्याची माहिती कालच भाजप नेत्यांना मिळाली होती. ही अत्यंत गंभीर बाब आहे. 

निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) झारखंड निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. जेएमएम नेते मनोज पांडे म्हणाले की, निवडणूक आज जाहीर होणार आहे, मात्र त्याची माहिती कालच भाजप नेत्यांना मिळाली होती. ही अत्यंत गंभीर बाब आहे. 

भाजप नेत्यांच्या सूचनेवर निवडणूक आयोग काम करत आहे का? असा सवाल मनोज पांडे यांनी केला आहे. मनोज पांडे म्हणाले, "आम्ही नेहमीच निवडणुकीसाठी तयार असतो... पण आज निवडणुका जाहीर होणार आहेत आणि भाजप नेत्यांना कालच याची माहिती मिळाली. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. निवडणूक आयोग भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करतो का? हिमंत बिस्वा सरमा यांनी काल दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज निवडणुका जाहीर होणार आहेत. कोणत्याही आयोगाला अशा प्रकारे कठपुतळीसारखे ठेवणे ही गंभीर बाब आहे."

दरम्यान, झारखंडच्या निवडणुका वेळेच्या एक महिना आधी होत असल्याचे जेएमएमचे म्हणणे आहे. तसेच, मनोज पांडे म्हणाले, "काल भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणाले, निवडणूक आयोग आज निवडणुकीची घोषणा करेल... आणि तेच झाले. बॉसने सर्व काही सेट केले आहे. काय सीन आहे." याशिवाय, या मुद्द्यावर निवडणूक आयोग काही बोलणार का? असा सवालही जेएमएमकडून करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगावर काँग्रेसनेही उपस्थित केले प्रश्नचिन्ह झारखंड काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर यांनीही आज निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभा निवडणुकीच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "तुम्हाला महाराष्ट्रासोबत झारखंडच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, पण हरयाणामध्ये ३ नोव्हेंबरला आणि महाराष्ट्रात २६ नोव्हेंबरला सरकारचा कार्यकाळ संपत होता. मग या दोघांच्या निवडणुका एकत्र का घेतल्या नाहीत? जेव्हा तुम्ही आमचे ऐकत नाही, तेव्हा आम्हाला वाटते की, तुम्ही राजकीय कारणांसाठी किंवा विशिष्ट पक्षाच्या प्रभावाखाली अशा घोषणा करता. तरीही आम्ही निवडणूक आयोगाचा आदर करतो. आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि प्रत्येक परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ."

टॅग्स :Jharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाJharkhandझारखंड