शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 05:37 IST

राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांनाही मतदानाचा हक्क; आरोग्याचे कारण विरोधकांना पटेना; लवकरच होणार निवडणूक

नवी दिल्ली :  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीकडे बहुमत उपलब्ध असल्याने त्यांना काळजीचे कारण नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. उपराष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांमार्फत होते. यामध्ये राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांनाही मतदानाचा हक्क असतो.सर्व पात्र सदस्यांनी मतदान केल्यास विजयी होण्यासाठी ३९४ मतांची आवश्यकता आहे. लोकसभेत ५४२ सदस्यांमध्ये एनडीएला २९३ सदस्यांचे समर्थन आहे. राज्यसभेच्या २४० सदस्यसंख्येत एनडीएला १२९ सदस्यांचा पाठिंबा आहे, यामध्ये नामनिर्देशित सदस्यदेखील एनडीएच्या उमेदवाराला मतदान करतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. या आधारावर एनडीएकडे ७८६ पैकी ४२२ सदस्यांचे समर्थन असून, या बहुमतावर त्यांचा उमेदवार या निवडणुकीत सहज विजयी होईल. 

नवे उपराष्ट्रपती कधी येणार?धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींसाठी निवडणूक लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे. मृत्यू, राजीनामा, पदावरून हटविणे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे उपराष्ट्रपतिपद रिक्त झाल्यास त्यानंतर लवकरात लवकर नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक घ्यावी, असे संविधानाच्या कलम ६८(२)मध्ये म्हटले आहे. या निवडणुकीत निवडून आलेल्या व्यक्तीस पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळतो.‘त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली’जगदीप धनखड यांना विविध जबाबदाऱ्या पार पाडत देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, अशा शुभेच्छाही मोदी यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर धनखड यांच्याविषयी लिहिलेल्या एका पोस्टमध्ये ही मते व्यक्त केली आहेत. राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात धनखड यांनी म्हटले होते की, प्रकृतीची काळजी घेण्यास प्राधान्य देण्याकरिता व वैद्यकीय सल्ल्यानुसार मी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा संविधानाच्या कलम ६७ (अ)मधील तरतुदीनुसार देत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाjagdeep dhankharजगदीप धनखडIndiaभारत