शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

भाजपला कधी पावलेच नाहीत ‘हे’ देव, सोमनाथ पावणार का?

By यदू जोशी | Updated: November 27, 2022 09:14 IST

जिंकण्यासाठी धार्मिक सर्किटची मोहीम

यदु जोशी

अहमदाबाद : हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाला गुजरातमधील प्रमुख धार्मिक स्थळे असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पराभवाचे चटके अनेकदा सहन करावे लागले आहेत. यावेळी पराभवांची मालिका खंडित करण्याचा चंग पक्षाने बांधला आहे. पक्षाने त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करीत त्यासाठी मिशन धार्मिक सर्किट ही गुप्त मोहीम हाती घेतली आहे. 

दांता : बनासकांठा जिल्ह्याच्या दांता विधानसभा मतदारसंघात येणारे अंबाजी माता मंदिर हे लाखो गुजराती बांधवांचे श्रद्धास्थान. इथे १९९८ पासून २०१७ पर्यंत काँग्रेसने विजय मिळविला. दोन वेळा आमदार असलेले कांती खराडी पुन्हा काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपने लधुभाई पारघी हा नवा चेहरा दिला आहे. 

खेडब्रह्मा : साबरकांठा जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचे अतिप्राचीन धार्मिक स्थळ. इथे २४ वर्षांपासून काँग्रेस जिंकत आहे. तीन वेळचे  आमदार अश्विन कोतवाल यावेळी मात्र भाजपचे उमेदवार आहेत. तुषार चौधरी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. 

चोटीला : सुरेंद्रनगरमध्ये असलेले माताजी का मंदिर हे प्राचीन श्रद्धास्थान चोटीला मतदारसंघात येते. इथे पाच निवडणुकीत केवळ २०१२ साली भाजपने विजय झाला. काँग्रेसने विद्यमान आमदार ऋत्विक मकवाना यांना, तर भाजपने शमजी चौहान यांना संधी दिली आहे.

जमालपुरा : भगवान जगन्नाथाचे मंदिर जमालपुरा मतदारसंघात येते. भाजपला इथेही विजयाची प्रतीक्षा आहे. विद्यमान आमदार इम्रान खेडावाला काँग्रेसचे उमेदवार आहे त तर भाजपचे भूषण भट्ट मैदानात आहेत. 

सोमनाथ पावणार का?प्रभास पाटण : प्रख्यात असे सोमनाथ मंदिर प्रभास पाटण मतदारसंघात असून तेथे गेल्या पाचपैकी तीन विधानसभेत काँग्रेस जिंकली. २०१२ मध्ये काँग्रेसकडून जिंकलेले जश्या बारड २०१७ मध्ये भाजपकडून लढले पण सोमनाथ पावले नाहीत, काँग्रेसचे विमल चुडासामा जिंकले, तेच यावेळीही उमेदवार आहेत. भाजपने मानसिंह परमार हा नवा चेहरा दिला आहे.

टॅग्स :BJPभाजपाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Templeमंदिर