शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला २४०पेक्षा जास्त; तर काँग्रेसला १४०हून अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:08 IST

लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या पाच टप्प्यांमध्ये २६ राज्यांतील ४२५ जागांसाठी मतदान झाले आहे. नेमक्या किती जागा जिंकणार याबद्दलचे अंदाज काँग्रेस व भाजपच्या वॉररुममध्ये लढविले जात आहेत.

- हरिश गुप्तानवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या पाच टप्प्यांमध्ये २६ राज्यांतील ४२५ जागांसाठी मतदान झाले आहे. नेमक्या किती जागा जिंकणार याबद्दलचे अंदाज काँग्रेस व भाजपच्या वॉररुममध्ये लढविले जात आहेत. २४० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा दावा भाजपच्या सूत्रांनी केला असून १४०हून जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास आहे.दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयामध्ये त्या पक्षाची तर गुरुद्वारा रकबगंज मार्गावर काँग्रेसची वॉररुम आहे. भाजपच्या वॉररुममध्ये काम करणारे ५५ जण विविध मतदारसंघांतील मतदानाचे प्रमाण व अन्य बाबींचे अहोरात्र विश्लेषण करत आहेत. त्यातून भाजपला किती जागांवर विजय मिळेल याचा अंदाज बांधता जाईल. भाजपच्या वॉररुममधील लोक याआधी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने आता वॉररुममधील कामकाजावर अमित शहा लक्ष ठेवून आहेत. एनडीएतील घटक पक्ष लढवत असलेल्या जागांवर झालेले मतदान व तेथील स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी भाजपच्या वॉररुममध्ये स्वतंत्र विभाग आहे. रा. स्व. संघाच्या हजारो स्वयंसेवकांकडूनही माहिती मागविली जात आहे.२०१४मध्ये भाजपला २८२ जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत यापेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा भाजप करत असला तरी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये पक्षाला फटका बसेल अशी चर्चा त्या पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात आहे.मात्र ही उणीव पश्चिम बंगाल, कर्नाटक, हरयाणा या राज्यांत मिळू शकणाऱ्या यशामुळे भरून निघेल असे भाजपला वाटते.महाराष्टÑात काँग्रेसला ११ ते १३ जागा ?उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात प्रत्येकी ११ ते १३ जागा मिळतील असे काँग्रेसला वाटत आहे. राजस्थानमध्ये १५, मध्य प्रदेशमध्ये १४, छत्तीसगढमध्ये ८, पंजाबमध्ये ८ ते ९, आसाममध्ये ६ ते ७, गुजरातमध्ये ६ इतक्या जागांवर विजय मिळेल असा त्या पक्षाला विश्वास आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा