शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आम्हीही देवळात जातो, पण त्याचा दिखावा करत नाहीः सोनिया गांधींची भाजपला चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 12:44 IST

26 मे 2014 पूर्वी देश अंध:कारात बुडाला होता का? गेल्या चार वर्षांमध्येच भारताने प्रगती, समृद्धी आणि उत्तुंगता प्राप्त केली आहे का?

नवी दिल्ली: काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे, हे भाजपने लोकांच्या मनावर बिंबवले. आम्ही नेहमीच देवळांमध्ये जायचो. मी राजीव गांधींसोबत प्रवास करायचे तेव्हा आम्ही अनेक मोठ्या मंदिरांना भेट द्यायचो. मात्र, आम्ही या सगळ्याचा कधी दिखावा केला नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सोनिया गांधी शुक्रवारी 'इंडिया टुडे कॉनक्लेव्ह'च्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, 26 मे 2014 पूर्वी देश अंध:कारात बुडाला होता का? गेल्या चार वर्षांमध्येच भारताने प्रगती, समृद्धी आणि उत्तुंगता प्राप्त केली आहे का? त्यामुळे असा दावा करणे हा आपल्या देशातील आजपर्यंतच्या बुद्धीवंतांचा अपमान नाही का?, असे अनेक सवाल यावेळी सोनिया यांनी उपस्थित केले. सध्या न्याययंत्रणेत मोठा गोंधळ माजला आहे. व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकार कायदा (आरटीआय) अस्तित्त्वात आला. मात्र, आता हा कायदा बासनात गुंडाळला गेला आहे. 'आधार'चा वापर घुसखोरीच्या साधनासारखा केला जात असल्याचा आरोप सोनिया यांनी केला. यावेळी सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्ष सामान्यांशी संवाद राखण्यात अपयशी ठरल्याचीही कबुली दिली. आमच्या अनेक पद्धती कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याचे नवीन तंत्र शोधून काढण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सोनिया गांधी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीTempleमंदिर