शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप; भाजपाने सोडली पीडीपीची साथ; सरकार गेलं अल्पमतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 15:04 IST

मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.

नवी दिल्ली -  मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. भाजपाचे नेते राम माधव यांनी या आज दुपारी दिल्लीमध्ये या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले आहे. रमजानच्या काळात राज्यात लागू केलेली शस्त्रसंधी रद्द करण्याचा निर्णय  केंद्र सरकारने घेतल्यानंतर भाजपा आणि पीडीपीमधील तणाव कमालीचा वाढला होता. दरम्यान, मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाने केली आहे.  

 

मंगळवारी भाजपाच्या कोअर समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. रमझानच्या काळात राजझिंग कश्मीरचे संपादक शुजाद चौधरी यांची हत्या झाल्यानंतर भाजपा आणि पीडीपीमधील संबंध तणावपूर्ण झाले होते. जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करताना राम माधव म्हणाले,"जनतेने पाठिंबा दिल्यानंतर भाजपाने पीडीपीसोबत सरकार चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सद्यस्थितीत सरकारमध्ये राहणे अवघड झाले होते. राज्यात दहशतवाद वाढला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सहमती दर्शवल्यानंतर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे."राज्यात तीन वर्षे सरकार चालवल्यानंतर काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत. पीडीपीने प्रत्येकवेळी आम्हाला अडचणीत आणण्याचेच काम केले आहे. आपल्यावरील जबाबदारी निभावण्यात मेहबुबा मुफ्ती पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत, असेही राम माधव यांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपाने साथ सोडल्यानंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला आहे. 

जम्मू-काश्मीर विधानसभेतील संख्याबळ

पीडीपी - २८ भाजपा - २५ काँग्रेस - १२नॅशनल कॉन्फरन्स - १५

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीBJPभाजपाAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस