शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, CAA विरोधातील आंदोलनावरून सोनिया गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:24 IST

Citizen Amendment Act Protest : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात रणकंदन माजले आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच अस्तित्वात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात रणकंदन माजले आहे. या कायद्याविरोधात एकीकडे मोठमोठे मोर्चे निघत असताना दुसरीकडे या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली आहे. जनतेला सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी आपल्या व्हिडीओ संदेशातून केला आहे. 

सोनिया गांधी म्हणाल्या की, ''भाजपाचे सरकार देशभरातील विद्यार्थी आणि जनतेकडून करण्यात येत असलेले आंदोलन ज्या प्रकारे दाबत आहे ते पाहून काँग्रेस पक्ष चिंतीत झाल आहे. देशभरातील विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम आणि अन्य आघाडीच्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी भाजपा सरकारच्या फुटिरतावादी आणि लोकविरोधी धोरणांविरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलन करत आहेत. लोकशाहीमध्ये चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवण्याचा आणि चिंता व्यक्त करण्याचा नागरिकांना हक्क आहे, लोकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करणे ही सरकारची जबाबदारी आहे.  ''हे सरकार विरोधकांच्या आवाजाची गळचेपी करण्यासाठी निर्दयतेने बलप्रयोग करत आहे. ही बाब लोकशाही व्यवस्थेमध्ये अस्वीकारार्ह आहे. काँग्रेस पक्ष भाजपा सरकारकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा निषेध नोंदवतो. तसेच विद्यार्थी आणि जनतेच्या संघर्षामध्ये काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत असेल.   नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून गेल्या काही दिवसांत सुरू झालेल्या हिंसाचाराचे सत्र आजही सुरू राहिले. त्यात काही आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना बलप्रयोग करावा लागत आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण