शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर सरकार वाचवण्यासाठी भाजपाची मोर्चेबांधणी, नाराजांच्या मनधरणीसाठी दोन दिग्गज नेत्यांची पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 11:19 IST

मणिपूरमधील राज्यसभेची एकमेव जागा जिंकल्यानंतर भाजपाने राज्यातील सरकार वाचवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देसरकार वाचवण्यासाठी पूर्वोत्तर भारतातील भाजपाचे संकटमोचक मानले जाणारे हेमंत बिस्वा शर्मा यांना पक्षाने मैदानात उतरवले आहे. हेमंत बिस्व शर्मा आणि कोनार्ड संगमा हे भाजपा आणि नॅशनल पीपल्स पार्टी च्या मणिपूरमधील शाखेत निर्माण झालेले मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करतीलमतभेदांमुळे एनपीपीच्या चार आमदारांनी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या सरकारला असलेला पाठिंबा मागे घेतला होता

इंफाळ - तीन आमदारांनी दिलेले राजीनामे आणि काही सहकारी आमदारांनी काढलेल्या पाठिंब्यामुळे मणिपूरमधील भाजपा सरकार अडचणीत सापडले आहे. दरम्यान, मणिपूरमधील राज्यसभेची एकमेव जागा जिंकल्यानंतर भाजपाने राज्यातील सरकार वाचवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सरकार वाचवण्यासाठी पूर्वोत्तर भारतातील भाजपाचे संकटमोचक मानले जाणारे हेमंत बिस्वा शर्मा यांना पक्षाने मैदानात उतरवले आहे. हेमंत बिस्व शर्मा रविवारी रात्री मणिपूरची राजधानी इंफाळ येथे पोहोचले असून, त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री आणि एनपीपीचे नेते कोनार्ड संगमा हे सुद्धा मणिपूरमध्ये पोहोचले आहेत.

भाजपा आणि एनपीपीमधील सूत्रांनी सांगितले की, हेमंत बिस्व शर्मा आणि कोनार्ड संगमा हे भाजपा आणि नॅशनल पीपल्स पार्टी च्या मणिपूरमधील शाखेत निर्माण झालेले मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करतील. या मतभेदांमुळे एनपीपीच्या चार आमदारांनी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या सरकारला असलेला पाठिंबा मागे घेतला होता.

दरम्यान, कोनार्ड संगमा यांच्यासाठी केवळ भाजपा हाच चिंतेचा विषय नाही आहे. तर आपल्या पक्षांतर्गत निर्माण झालेली परिस्थिती ही सुद्धा चिंतेची बाब आहे. आता इंफाळ दौऱ्यादरम्यान, पक्षाच्या मणिपूरमधील शाखेत निर्माण झालेल्या संकटाला नियंत्रित करता येईल, अशी कोर्नाड संगमा यांची अपेक्षा आहे.  

हेमंत बिस्वा शर्मा आणि कोर्नाड संगमा यांनी आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन चर्चा केली आहे. एनपीपीच्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याबाबत पुर्नविचार करावा, असे आवाहन, कोर्नाड संगमा यांनी केले आहे.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात नेतृत्वबदलाशिवाय अन्य कुठल्याही बाबीवर तडजोड होणार नसल्याचे एनपीपीने भाजपा नेतृत्व आणि हेमंत बिस्व शर्मा यांना स्पष्टपणे सांगितले आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण