शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपनं 4 राज्यांसाठी मैदानात उतरवली 'टीम 11'; अमित शाह, जेपी नड्डा यांना विशेष जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:32 IST

भाजपने या राज्यांसाठी 4 केंद्रीय मंत्र्यांसह 9 जणांना यापूर्वीच जबाबदारी दिली आहे.

आगामी काही महिन्यांत मध्य प्रदेश आणि राजस्थानसह चार राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यांपैकी केवळ मध्य प्रदेशातच भाजप सत्तेवर आहे. याशिवाय छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये सत्तेत येण्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल. या मोठ्या जबाबदारीची धुरा खुद्द गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत हे दोन्ही नेते दर आठवड्याला या चारही राज्यांचा दौरा करतील. भाजपने या राज्यांसाठी 4 केंद्रीय मंत्र्यांसह 9 जणांना यापूर्वीच जबाबदारी दिली आहे.

भाजपकडून या चार राज्यांच्या निवडणुकीसाठी, ज्या नेत्यांच्या खांद्यावर धुरा दिली आहे, त्यांपैकी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. ओम माथूर आणि मनसुख मांडविय यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रल्हाद जोशी, नितीन पटेल आणि कुलदीप बिश्नोई यांच्याकडे राजस्थानची धुरा देण्यात आली आहे. तर तर प्रकाश जावडेकर आणि सुनील बन्सल यांना तेलंगणात पाठविण्यात आले आहे. या सर्वांकडून अमित शहा आणि जेपी नड्डा संबंधित राज्यांतील भाजपच्या तयारीचा आढावा घेतील. त्यातही अमित शहा विशेषत: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर लक्ष केंद्रित करणार आहेत. तर, जेपी नड्डा यांच्याकडे राजस्थान आणि तेलंगणाची जबाबदारी असेल.

अमित शाह करताय MP आणि छत्तीसगडचे दौरे -गेल्या काही आठवड्यांत अमित शाह यांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अनेक दौरे केले आहेत. मध्य प्रदेशात त्यांनी नेत्यांना गटबाजीपासून दूर राहत काम करण्याचा सल्लाही दिला आहे. मध्य प्रदेशात पक्षाने प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कायम ठेवण्याचा संदेशही दिला आहे. याशिवाय सीएम शिवराज यांचा चेहराही वापरण्यात येणार आहे. ते सध्या चौथ्यांदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डाElectionनिवडणूकRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगडTelanganaतेलंगणा