शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

भाजपाचे अच्छे दिन! कॉर्पोरेट्सकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 09:33 IST

विरोधकांच्या एकूण देणग्यांच्या तुलनेत भाजपाला 12 पट देणग्या

नवी दिल्ली: कॉर्पोरेट कंपन्यांकडून भाजपाला सर्वाधिक देणग्या मिळत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं (एडीआर) ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला 437 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय आणि तृणमूल काँग्रेस यांच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या देणग्यांचं प्रमाण 12 पट आहे. उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात समाजवादी पार्टीसोबत आघाडी करणाऱ्या बहुजन समाज पार्टीला 20 हजार रुपयांपेक्षा अधिकची देणगी मिळालेली नाही. बसपानं या संदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला लिखित स्वरुपात दिली आहे. देशातील राष्ट्रीय पक्षांना 20 हजारांहून अधिक रकमेच्या एकूण 4 हजार 201 देणग्या मिळाल्या आहेत. यातून मिळालेली रक्कम 469.89 इतकी आहे. यातील 437.04 कोटी रुपये एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत. भाजपाला मिळालेल्या देणग्यांची संख्या 2,977 इतकी आहे.भाजपाच्या तुलनेत काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांची संख्या आणि देणग्यांमधून मिळालेली रक्कम अतिशय कमी आहे. काँग्रेसला 777 देणग्यांच्या माध्यमातून एकूण 26.65 कोटी रुपये मिळाले आहेत. देशातील राष्ट्रीय पक्षांना 2017-18 मध्ये कॉर्पोरेट आणि व्यवसाय क्षेत्रातून एकूण 1,361 देणग्यांमधून 422.04 कोटी रुपये मिळाले. तर 2,772 वैयक्तिक देणग्यांच्या स्वरुपात 47.12 कोटी रुपये मिळाले आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांनी सर्वाधिक देणग्या भाजपाला दिल्या आहेत. या माध्यमातून भाजपाला 400.23 कोटी रुपये मिळाले आहेत. तर काँग्रेसला अवघे 19.29 कोटी रुपये मिळाले आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस