तामिळनाडूचं समीकरण न जुळल्यास परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गुजरातमधून राज्यसभेवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:29 PM2019-06-03T14:29:58+5:302019-06-03T14:32:06+5:30

मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री झालेल्या एस. जयशंकर यांना भाजपा राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे.

bjp eyes gujarat rajya sabha seat to get jaishankar into house after tamil nadu? | तामिळनाडूचं समीकरण न जुळल्यास परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गुजरातमधून राज्यसभेवर जाणार

तामिळनाडूचं समीकरण न जुळल्यास परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गुजरातमधून राज्यसभेवर जाणार

Next

नवी दिल्लीः मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री झालेल्या एस. जयशंकर यांना भाजपा राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा एस. जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवू शकतो. आधी त्यांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपाचा विचार होता. परंतु एआयडीएमकेबरोबर समीकरण जुळून येत नसल्यानं त्यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

अमित शाह आणि स्मृती इराणींना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला आहे. त्यामुळे ते राज्यसभेच्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा देणार आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरात भाजपाच्या कोट्यातील राज्यसभेच्या दोन जागा रिकामी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या एआयडीएमकेला मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेलं नाही. तामिळनाडूत 39 पैकी 38 लोकसभेच्या जागांवर निवडणूक झाली. परंतु भाजपाच्या या सहयोगी पक्षाला फक्त एका जागी विजय मिळालेला आहे. एआयएडीएमकेला आपल्या कोट्यातील राज्यसभेच्या चार जागांपैकी एक जागा भाजपाला देण्याचा दबाव आहे. जी 24 जुलै रोजी रिकामी होत आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भाजपा तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवू इच्छित होता. तामिळनाडू हे त्यांचं गृहराज्य आहे. त्यानंतर जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्यात येऊ शकते. कारण इथे राज्यसभेच्या दोन जागा रिकाम्या झाल्या आहेत. तामिळनाडूतल्या कन्याकुमारी लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस नेते एच वसंत कुमार यांनी नानगुनाही विधानसभेच्या जागेवरून राजीनामा दिला आहे. वसंत कुमार यांच्या राजीनाम्यानंतर 234 विधानसभा सदस्याची संख्या 233वर आली आहे. विरोधी पक्ष द्रमुकचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसची एक जागा कमी होऊन सात झाल्या आहेत. 24 जुलै रोजी तामिळनाडूच्या सहा राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. 

Web Title: bjp eyes gujarat rajya sabha seat to get jaishankar into house after tamil nadu?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.