BJP Expelled Two MLAs: भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने कर्नाटकातील दोन आमदारांवर मोठी कारवाई केली आहे. आमदार ए. शिवराम हेब्बार आणि एस.टी. सोमशेखर यांची भाजपने सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. भाजपने केलेल्या या कारवाईने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाजपने ए शिवराम हेब्बार आणि एसटी सोमशेखर यांच्यावर पक्षाची शिस्त मोडणे आणि पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यापूर्वी भाजपने दोन्ही आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
दोन आमदारांची भाजपतून हकालपट्टी का करण्यात आली?
आमदार हेब्बार आणि सोमशेखर यांच्यावर ज्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे, ते फेब्रुवारीमध्ये घडले होते.
वाचा >>बाल गणेशपण परदेशातून येतो... शपथ घ्या...! मोदींचे ऑपरेशन सिंदूरवर देशवासियांना मोठे आवाहन
फेब्रुवारी २०२५ मध्ये कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यासाठी मतदान झाले. चारपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या तर एक जागा भाजपने जिंकली होती. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते.
भाजपने या निवडणुकीसाठी व्हीप जारी केला होता. पण, भाजपच्या या दोन आमदारांनी काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांना मतदान केले होते. या प्रकरणात भाजपने दोन्ही आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दोन्ही आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केल्याचे आरोप फेटाळून लावले होते. पण, पक्षाने दोघांनाही दोषी ठरवत सहा वर्षांसाठी भाजपतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.
आमदार सोमशेखर आणि आमदार हेब्बार हे कर्नाटकातील भाजप नेतृत्वाबद्दल नाराज असल्याच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. एसटी सोमशेखर हे कर्नाटकातील यशवंतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर शिवराम हेब्बार हे येल्लापूरचे आमदार आहेत.