शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'YES BANK लुटणाऱ्या उद्योजकांकडून भाजपाला कोट्यवधींचं डोनेशन', 'आप'ने दाखवली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 09:20 IST

हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराच्या (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अटक केलेले Yes Bank चे संस्थापक राणा कपूर आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी परिचित होते

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाचा एनपीए वाढल्याने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सन 2017 पासून रिझर्व्ह बँक सातत्याने येस बँकेचे निरीक्षण आणि चौकशी करीत आहे. येस बँकेचा कारभार खूपच कमकुवत होता. क्रेडिट निर्णयांसोबत, मालमत्तेचे चुकीचे वर्गीकरण सुद्धा करण्यात आले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. याप्रकरणी बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली आहे. आता, आम आदमी पक्षाकडून yes बँकेच्या थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराच्या (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अटक केलेले Yes Bank चे संस्थापक राणा कपूर आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी परिचित होते. लंडनमध्ये संपत्ती जमवणारे राणा कपूर यांची भारतात देखील खूप संपत्ती आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या अँटिलियाशेजारी राणा कपूरच्या कुटुंबीयांनी 127 कोटींचा बंगला विकत घेतला. देशातील बड्या उद्योजकांशी या बँकेचे मोठे आर्थिक व्यवहार झाले असून हे उद्योजकच बँकेच्या डबघाईला कारणीभूत असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. आम आदमी पक्षाच्या माहितीनुसार, अनिल अंबानी ग्रुपकडे येस बँकेचे 13 हजार कोटी रुपये आहेत. एसेल ग्रपकडे 3300 कोटींची थकबाकी आहे. तसेच, रेडियस डेव्हलपर्सकडे 1200 कोटी, डीएचएफएल ग्रुपकडे 3750 कोटी, आरकेडब्लूकडे 1200 कोटी रुपयांची थकबाकी आहे. आपचे नेते संजय सिंग यांनी फोटो शेअर करत, भाजपाच्या मित्रांनीच येस बँकेवर दरोडा टाकल्याचं म्हटलंय. तसेच भाजपाला वरील कर्जाची थकबाकी असलेल्या कंपन्यांकडून भाजपाला मोठ्या स्वरुपात देणगीही देण्यात आली आहे. 

दरम्यान, खातेदारांना 50 हजार रुपये काढण्याचे लादलेले निर्बंध लवकरच संपुष्टात आणण्याची शक्यता आहे. RBI आठवड्याभरात बँकेतून 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा हटवू शकते. सद्यस्थितीत ग्राहकाला खात्यातून फक्त 50 हजार रुपये काढता येत आहेत. त्याहून अधिकची रक्कम ग्राहक काढू शकत नाही. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीYes Bankयेस बँकAnil Ambaniअनिल अंबानी