शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात आंदोलनं सुरू होताच भाजपाकडून एनआरसीबद्दलचं 'ते' ट्विट डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 17:21 IST

देशभरातील वातावरण तापताच भाजपाकडून अमित शहांच्या विधानाचं ट्विट डिलीट

मुंबई: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. हा कायदा मागे घेण्याची मागणी करत देशभरात लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण तापलं असताना भाजपानं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक जुनं ट्विट डिलीट केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा अध्यक्ष अमित शहांनी केलेलं विधान भाजपानं ट्विट केलं होतं. मात्र काल (१९ डिसेंबर) हे ट्विट काढून टाकण्यात आलं. लोकसभा निववडणुकीवेळी प्रचार करताना एप्रिल महिन्यात अमित शहांनी एका भाषणादरम्यान राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवर भाष्य केलं होतं. आम्ही संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करू असं अमित शहा म्हणाले होते. मात्र याच विषयावर बोलताना त्यांनी एक केलेलं विधान वादग्रस्त ठरलं. बौद्ध, हिंदू आणि शीख यांचा अपवाद वगळता आम्ही सगळ्या घुसखोरांची देशातून हकालपट्टी करू, असं शहा म्हणाले होते. त्यांचं हे विधान भाजपानं ट्विटदेखील केलं होतं. मात्र कालच भाजपानं हे ट्विट डिलीट केलं. सध्या या ट्विटचे स्क्रीनशॉट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 

अमित शहांचं ट्विट डिलीट केल्यावर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी भाजपाला चिमटा काढला. भाजपाची आयटी सेल ट्विट डिलीट करू शकतं. मात्र गृहमंत्री संसदेत काय म्हणाले, हे त्यांना डिलीट करता येणार नाही, अशा शब्दांत ओब्रायन यांनी भाजपाला टोला लगावला. यानंतर काहींनी बंगाल भाजपाच्या ट्विटर हँडलकडे लक्ष वेधलं. भाजपा फॉर इंडियानं अमित शहांचं ट्विट केल्यावरही बंगाल भाजपाच्या ट्विटर हँडलवर मात्र अद्याप ते ट्विट दिसत आहे.  

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीAmit Shahअमित शहाBJPभाजपा