शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भाजपात लोकशाहीच्या पद्धतीनं निर्णय होतात- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 17:56 IST

भाजपाच्या दिल्ली मुख्यालयाचा पत्ता आता '11 अशोका रोड' ऐवजी '6, दीनदयाल उपाध्याय मार्ग' असा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली-  भाजपाच्या दिल्ली मुख्यालयाचा पत्ता आता '11 अशोका रोड' ऐवजी '6, दीनदयाल उपाध्याय मार्ग' असा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या नव्या मुख्यालयाचं आज उद्घाटन केलं आहे. भाजपा हा 100 टक्के लोकशाही पद्धतीनं चालत असलेला पक्ष असल्याचा दावा यावेळी मोदींनी केला. भाजपात निर्णय घेण्यापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंतच्या गोष्टी लोकशाहीच्या माध्यमातूनच होतात. कमी वेळेत इमारतीचं काम पूर्णत्वास नेल्याबद्दल त्यांनी अमित शाह आणि टीमचं कौतुकही केलंय.श्यामाप्रसाद मुखर्जी व दीनदयाळ उपाध्याय यांनी जे बीज रोवलं होतं, ते आज वटवृक्ष बनून लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करत आहे. हे भाजपाच्या तमाम कार्यकर्त्यांचं कार्यालय आहे,' असं ते म्हणाले. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांनी उपस्थिती दर्शवली होती. अवघ्या 16 महिन्यांत या पाच मजली अत्याधुनिक इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं. ऑगस्ट 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व राजकीय पक्षांना त्यांची कार्यालयं ल्युटन्स दिल्लीच्या बाहेर स्थलांतरित करायची आहेत.दीनदयाल उपाध्याय मार्गावर 2 एकराच्या परिसरात भाजपाने हे नवं मुख्यालय उभारलं आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा या पाच मजली इमारतीत एकूण 70 खोल्या आहेत. एकाच वेळी 400 वाहनांच्या पार्किंगची सोय आहे. या बांधकामात hollow bricks चा वापर करून वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तर विजेसाठी सोलार पॅनलचा वापर करण्यात आलाय. वॉटर हार्वेस्टिंग, बायोटॉयलेट्सचा समावेश करून पर्यावरणाची काळजी घेतल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्यालयात एकाचवेळी 600 लोक बसू शकतील, अशा दोन कॉन्फरन्स रूमही आहेत. वायफाय, एलिव्हेटर, टेलिव्हिजन मुलाखतींसाठी स्टुडिओ, डिजिटल लायब्ररी अशा सर्व सोयींनी युक्त असं हे मुख्यालय आहे. त्यामुळे 2019 साठी भाजपची वॉर रुम आता 11, अशोका रोडवरुन 6, दीनदयाल उपाध्याय मार्गावर असणार हे निश्चित झालं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा