शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा उमेदवाराचा CABला विरोध; म्हणाले, मोदींसमोरच आत्महत्या करेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 10:53 IST

भाजपाचे उमेदवार यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध दर्शविला आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाला कालपासून सुरुवात झाली आहे. देशात लोकसभेच्या 91 जागांसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी भाजपाच्या एका उमेदवाराने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (Citizenship Amendment Bill) विरोध दर्शविला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही. जर नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आत्महत्या करेन, असे या भाजपाच्या उमेदवाराने म्हटले आहे.

मेघालयात लोकसभेच्या दोन जागा आहेत. एक शिलाँग आणि तुरा. या दोन्ही जागा येथील स्थानिक आदिवासी समुदायांसाठी आरक्षित आहेत. काल, 11 एप्रिलला या लोकसभेच्या दोन्ही जांगासाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी भाजपाचे उमेदवार सनबोर शुलाई यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. मेघालयातील शिलाँग मतदार संघातून सनबोर शुलाई निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

'मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू होऊ देणार नाही. यासाठी मला जीव द्यावा लागला तरी चालेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मी आत्महत्या करेन. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक अमलात आणू देणार नाही', असे सनबोर शुलई यांनी म्हटले आहे. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध का?जर नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाले तर ईशान्य भारतातल्या स्थानिक लोकांच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का पोहोचेल अशी भीती वाटत असल्यामुळे अनेक संस्थासह पक्ष याचा विरोध करत आहेत. तसेच, नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले तर बांगलादेशातून आलेल्या निर्वासित हिंदूंची संख्या वाढेल आणि स्थानिकांची कमी होईल अशी भीती आसाममधील नागरिकांना वाटत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाshillong-pcशिलांगMeghalaya Lok Sabha Election 2019मेघालय लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी