शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा भाजपा देशात दंगली घडवेल, योगींच्या मंत्र्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 07:55 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या सरकार मंत्री असलेल्या ओम प्रकाश राजभर यांनी भाजपा देशात दंगली घडवेल, असं वादग्रस्त विधान केलं आहे.

ठळक मुद्दे भाजपाच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओम प्रकाश राजभर यांनी भाजपा देशात दंगली घडवेल, असं वादग्रस्त विधान केलं..अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या अहवालाचा हवाला देत त्यांनी हा दावा केला आहे. बलियातल्या बांसडीहमधल्या सैदपुरा गावातील एका जनसभेला संबोधित करताना राजभर यांनी हे विधान केलं..

लखनऊः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओम प्रकाश राजभर यांनी भाजपा देशात दंगली घडवेल, असं वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या अहवालाचा हवाला देत त्यांनी हा दावा केला आहे. ते भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज(एसबीएसपी)चे प्रमुख आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, बलियातल्या बांसडीहमधल्या सैदपुरा गावातील एका जनसभेला संबोधित करताना राजभर यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या अहवालात सांगितलं आहे की, भाजपा देशात दंगली घडवेल, देशात दंगली होऊ शकतात, त्यामुळे जनतेनं हिंदू-मुस्लिमांच्या नावानं भांडू नये, दंगलीत कोणत्याही नेत्याचा नव्हे, तर सामान्य व्यक्तीचाच जीव जातो, असंही त्यांनी अधोरेखित केलं आहे. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएनं केला होता. अमेरिकी सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली होती. भाजपानं निवडणुकीपूर्वी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर जोर दिल्यास देशात सांप्रदायिक दंगली भडकतील, असा दावा या अहवालात करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला. जो सीआयए या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी तयार केला आहे. 

रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर पुढे गेल्यास भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दंगली होतील. अमेरिका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हा अहवाल प्रसिद्ध करते. ज्यात देशभरातील घटनांचं मूल्यांकन केलेलं असतं.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश