भाजपा, झामुमोच्या कार्यकत्र्यात जुंपली
By Admin | Updated: August 24, 2014 02:38 IST2014-08-24T02:38:21+5:302014-08-24T02:38:21+5:30
केंद्रीय श्रम व पोलाद व खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना काळे ङोंडे दाखविण्यासाठी जमलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकत्र्यात आणि भाजपाच्या कार्यकत्र्यामध्ये शनिवारी हाणामारी झाली.

भाजपा, झामुमोच्या कार्यकत्र्यात जुंपली
रांची : झारखंडमध्ये एका शासकीय कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय श्रम व पोलाद व खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना काळे ङोंडे दाखविण्यासाठी जमलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकत्र्यात आणि भाजपाच्या कार्यकत्र्यामध्ये शनिवारी हाणामारी झाली. यात अध्र्या डझनाहून अधिक लोक जखमी झाले तर पोलिसांनी दोन डझनाहून अधिक कार्यकत्र्याना अटक केली आहे.
येथील विमानतळाबाहेर असलेल्या हिनू चौकात हा राडा झाला. तोमर हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता झामुमोच्या कार्यकत्र्यानी त्यांना काळे ङोंडे दाखविले आणि हिनू चौकात त्यांच्याविरुद्ध निदर्शने केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भाजपाच्या कार्यकत्र्यानी याला विरोध केला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकत्र्यात आधी बाचाबाची व नंतर हाणामारी झाली.
‘पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व दोन डझनाहून अधिक कार्यकत्र्याना जेरबंद केले’, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. (वृत्तसंस्था)
4गुरुवारी भाजपाच्या काही समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करून त्यांची खिल्ली उडवली होती. त्यामुळे संतप्त झामुमोने राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमांना यापुढे विरोध करण्याची घोषणा केली होती.