शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार? शिवसेनेला जे दिलं नाही, ते 'या' पक्षाला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 15:43 IST

मोदी-शाहा-नड्डांची नवी व्यूहनीती; आणखी एका राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करण्याची तयारी

पाटणा/नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. संयुक्त जनता पक्षाचा मित्र असलेल्या भाजपनं कुमार यांना राज्यसभेत पाठवण्याचं समर्थन केलं आहे. 

नितीश कुमार यांना राज्यसभेत जायचं असल्यास त्यांची इच्छा भाजप पूर्ण करेल, असं बिहार भाजपचे फायरब्रँड नेते आणि आमदार हरी भूषण ठाकूर यांनी म्हटलं आहे. अशा स्थितीत राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होईल, असंही ठाकूर पुढे म्हणाले. नितीश कुमार यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली आहे. सुशासनबाबू अशी ओळख असलेल्या नितीश यांचं सरकार असताना राज्यात दारूबंदीवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच स्थितीचा फायदा उचलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

नितीश कुमार राज्यसभेत गेल्यास बिहारमध्ये भाजप स्वत:चा मुख्यमंत्री बसवेल. २०२० मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली. भाजपला ७४ जागा मिळाल्या. त्यात काही दिवसांपूर्वी व्हिआयपी पक्षाच्या ३ आमदारांची भर पडली. म्हणजे विधानसभेत भाजपचे ७७ आमदार आहेत. तर नितीश यांच्या संयुक्त जनता दलाच्या सदस्यांची संख्या ४३ इतकी आहे. 

२०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवलं. एनडीएचा भाग असलेल्या पक्षांमध्ये सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आल्या. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा असावा असा एक मतप्रवाह भाजपमध्ये होता. आजही भाजपच्या अनेक आमदारांना तेच वाटतं. त्यामुळेच नितीश दिल्लीला जाताच भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा करेल.

जेडीयूचे दोन नेते उपमुख्यमंत्री?नितीश कुमार यांच्या जागी भाजप नेत्याकडे मुख्यमंत्रिपद येईल. सध्या त्यासाठी नित्यानंद राय यांचं नाव आघाडीवर आहे. जेडीयूनं मुख्यमंत्रिपद सोडल्यास त्याबदल्यात त्यांना दोन उपमुख्यमंत्रिपदं दिली जातील. २०१४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. भाजप, शिवसेनेची युती तुटली असल्यानं दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. भाजपला १२२, तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. निकालानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. मात्र भाजपनं त्यांना एकही उपमुख्यमंत्रिपद दिलं नाही. फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदच नव्हतं. शिवाय शिवसेनेला कमी दर्जाची खाती दिली गेली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा