शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

BJP Attack On Sharad Pawar: 'दहशतवाद्यांना कुठलाही धर्म नसतो, पण...' पवारांच्या बॉलिवूड संदर्भातील वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 16:35 IST

''दादासाहेब फाळके, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, स्मिता पाटिल, माधुरी दीक्षित आदिंचे काय?" असा प्रश्न भाजपने केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी बॉलिवूडसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यानंतर, राजकी वातावरण तापले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्याचा निषेध करत, व्होट बँकेच्या नावाखाली कला आणि सिनेमाचे विभाजन कशासाठी, असा प्रश्न भाजपने केला आहे. शरद पवार यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना, मुस्लीम अल्पसंख्याकांनी बॉलीवूडमध्ये सर्वाधिक योगदान दिले आहे, असे म्हटले होते. यावर आता भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट करत, ''दादासाहेब फाळके, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, स्मिता पाटिल, माधुरी दीक्षित आदिंचे काय?" असा प्रश्न केला आहे. 

'दहशतवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो, पण...' -पुनावाला म्हणाले, ''तर दहशतवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो, मात्र कला आणि सिनेमाचा धर्म असतो पवार साहेब? पण आपण अशा पक्षाकडून काय अपेक्षा करू शकतो, ज्या पक्षाचा मंत्री नवाब मलिक डी कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. ते आधी देशाला हिंदू-मुस्लीम, असे विभाजित करतात.. मग वर्गात विभाजन करतात.. ते राजस्थानात विजेचेही विभाजन करतात. आता कला/सिनेमा विभाजन करत आहेत. हे अत्यंत दुःखद आहे.'' 

"या विचारामागे काय षडयंत्र आहे?" -याशिवाय, शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप नेते राम कदम यांनीही अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या नावाचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला, की काय ते इंडस्ट्रीमध्ये यांचे योगदाना नाकारू शकता? कदम म्हणाले, "दादा साहेब फाळके यांनी या इंडस्ट्रीची स्थापना केली. त्यांची व्होट बँकेच्या राजकारणासाठी कला आणि प्रतिभा यांना धर्माच्या नावाखाली विभाजित करण्याची इच्छा होती का?  या विचारामागे काय षडयंत्र आहे?"

काय म्हणाले होते शरद पवार? - खरे तर, शरद पवार यांनी दावा केला होता, की बॉलिवूडमध्ये सर्वाधिक योगदान मुस्लीम समाजाचे आहे आणि त्याकडे दूर्लक्ष करता येणार नाही.  ते म्हणाले होते, देशातील सर्वच क्षेत्रात अल्पसंख्याक आणि उर्दू भाषेचे योगदान आहे. एवढेच नाही, तर आज कला असो, लेखन असो किंवा कविता असो, सर्वात मोठे योगदान अल्पसंख्याकांचे आहे आणि ते उर्दू भाषेतून आले आहे. तसेच, बॉलीवूडला शीर्षस्थानी नेण्यात मुस्लीम अल्पसंख्याकांचे योगदान सर्वाधिक आहे.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाRam Kadamराम कदमMuslimमुस्लीमbollywoodबॉलिवूडNCPराष्ट्रवादी काँग्रेस