शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी मालामाल; भाजपाच्या संपत्तीत वर्षभरात तब्बल २२ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 16:53 IST

एडीआरकडून राजकीय पक्षांच्या संपत्तीची आकडेवारी जाहीर

नवी दिल्ली: सत्ताधारी भाजपाच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात २२ टक्क्यांनी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर याच कालावधीत काँग्रेसच्या संपत्तीत १५ टक्क्यांची घट पाहायला मिळाली. सात राष्ट्रीय पक्षांनी २०१६-१७ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षातील संपत्ती आणि रोख रकमेची माहिती जाहीर केली होती. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या सामाजिक संघटनेनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, सीपीआय, सीपीएम आणि तृणमूल काँग्रेस या सात पक्षांनी त्यांच्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला दिली. मात्र ही माहिती देत असताना या पक्षांनी अनेकदा नियमांचं उल्लंघन केल्याचं एडीआरनं म्हटलं आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशातील राष्ट्रीय पक्षांकडे ४६५.८३ कोटी रुपयांची सरासरी संपत्ती होती. २०१७-१८ या वर्षात सरासरी संपत्तीचा आकडा ४९३.८१ कोटींवर जाऊन पोहोचला. गेल्या वर्षभरात सत्ताधारी भाजपाची संपत्ती २२.२७ टक्क्यांनी वाढली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजपाची संपत्ती १२१३.१३ कोटी होती. वर्षभरात भाजपाच्या संपत्तीचा आकडा १४८३.३५ कोटींवर जाऊन पोहोचला. भाजपाची संपत्ती वाढत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपत्तीत मात्र घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये काँग्रेसकडे असलेल्या संपत्तीचं मूल्य ८५४.७५ कोटी होतं. मात्र सध्या काँग्रेसकडे ७२४.३५ कोटींची संपत्ती आहे. वर्षभरात काँग्रेसची संपत्ती १५.२६ टक्क्यांनी घटली आहे. सध्या गळतीमुळे त्रस्त झालेल्या राष्ट्रवादीची आर्थिक परिस्थितीदेखील फारशी चांगली नाही. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीच्या गंगाजळीत ११.४१ कोटी रुपये होते. मात्र आता राष्ट्रवादीकडे ९.५४ कोटी रुपये आहेत. वर्षभरात राष्ट्रवादीची संपत्ती १६.३९ टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र याच कालावधीत तृणमूलची संपत्ती १०.८६ टक्क्यांनी वाढली. वर्षभरापूर्वी तृणमूलची संपत्ती २६.२५ कोटी रुपये होती. आता ती संपत्ती २९.१० टक्क्यांवर गेली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग