भाजपाने प्रकाशित केले दोन जाहीरनामे; सरकारी कर्मचा-यांसाठी नवीन वेतन आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:26 AM2018-11-18T05:26:52+5:302018-11-18T05:27:12+5:30

मध्यप्रदेश निवडणुकांसाठी भाजपाने आपला जाहीरनामा शनिवारी वित्तमंत्री अरुण जेटली, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केला.

BJP announces two manifesto; New Pay Commission for Government employees | भाजपाने प्रकाशित केले दोन जाहीरनामे; सरकारी कर्मचा-यांसाठी नवीन वेतन आयोग

भाजपाने प्रकाशित केले दोन जाहीरनामे; सरकारी कर्मचा-यांसाठी नवीन वेतन आयोग

googlenewsNext

भोपाळ : मध्यप्रदेश निवडणुकांसाठी भाजपाने आपला जाहीरनामा शनिवारी वित्तमंत्री अरुण जेटली, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केला. भाजपाने महिलांसाठी वेगळा जाहीरनामा तयार केला असून, त्याला नारीशक्ती संकल्प पत्र असे नाव दिले आहे.
सर्वसाधारण जाहीरनाम्याला भाजपाने ‘दृष्टीपत्र' नाव दिले आहे. बारावीमध्ये ७५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनींना पुढील शिक्षणाच्या सोयीसाठी मोफत स्कूटी, नर्मदा एक्स्प्रेस वे, चंबळ एक्स्प्रेस वे, १0 लाख तरुणांना दरवर्षी नोक-या, राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी नवीन वेतन आयोग, ग्वाल्हेर व जबलपूरमध्ये मेट्रो अशी आश्वासनांची खैरात या जाहीरनाम्याद्वारे देण्यात आली आहे.
गेल्या १५ वर्षांत आम्ही मध्य प्रदेशचा भरपूर विकास केला, असा दावा करतानाच, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रत्येकाला अन्न, वस्त्र व निवाºयाची सोय हा आमचा संकल्प असल्याचे सांगितले. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात पाच वर्षांत पाच हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येईल, असे दृष्टीपत्रात म्हटले आहे, तर नारीशक्ती संकल्पपत्रात महिलांची सुरक्षा व शिक्षण यांवर भर दिला आहे.

Web Title: BJP announces two manifesto; New Pay Commission for Government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.