शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, संघाकडून देशात फूट पाडण्याचं काम सुरूय- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 16:38 IST

ओबीसी समुदायाशी संवाद साधताना राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली: भाजपा आणि संघाकडून देशात फूट पाडण्याचं काम केलं जात आहे, असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. ओबीसी समुदायाशी संवाद साधताना राहुल यांनी भाजपा आणि संघाला लक्ष्य केलं. 'संघाकडून देश विभागण्याचं काम केलं जातं आहे. त्यांना ओबीसी समुदायातही फूट पाडायची आहे,' असा हल्लाबोल राहुल यांनी केला. ते दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी संमेलनात बोलत होते. मोदी सरकारकडून ओबीसी समुदायाची उपेक्षा केली जात असल्याचा आरोप राहुल यांनी केला. 'काँग्रेसमध्ये इतर मागासवर्गीय जातींना योग्य तो सन्मान दिला जातो. मात्र भाजपामधील स्थिती तशी नाही. सध्या देशात जी व्यक्ती काम करते, तीच मागे राहते अशी स्थिती आहे. एखादी व्यक्ती काम करते, मात्र श्रेय दुसरीच व्यक्ती लाटते, असं चित्र सध्या देशात आहे. ज्याच्याकडे कौशल्य आहे, जो कष्ट करत आहे, त्याला योग्य तो सन्मान दिला जात नाही,' असं राहुल गांधी यांनी म्हटलं. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. 'मोदी सरकारनं शेतकऱ्यांना एक रुपया दिला नाही. मात्र याच सरकारनं 15 उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र तरीही त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. देशातील तरुणांनी कौशल्य आत्मसात करायला हवं, असं मोदीजी म्हणतात. मात्र देशातील तरुणांमध्ये कौशल्याची कमतरता नाही. मात्र त्यांच्या कौशल्याचा सन्मान केला जात नाही. भाजपामध्ये ओबीसींचं मत विचारात घेतलं जात नाही. मात्र काँग्रेसमध्ये ओबीसींना योग्य सन्मान दिला जातो', असं राहुल यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ