ननवर बलात्कार करणाऱ्या बिशपला अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 05:28 IST2018-09-22T05:28:02+5:302018-09-22T05:28:10+5:30

केरळमधील एका ननवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपावरून बिशप फ्रँको मुलक्कल याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

The bishop, who raped a minor, is finally arrested | ननवर बलात्कार करणाऱ्या बिशपला अखेर अटक

ननवर बलात्कार करणाऱ्या बिशपला अखेर अटक

कोची : केरळमधील एका ननवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपावरून बिशप फ्रँको मुलक्कल याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. गेल्या तीन दिवसांपासून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. त्याला दोनच दिवसांपूर्वी पदमुक्त करण्यात आले होते. जालंधरचा बिशप असलेल्या मुलक्कलला त्या पदावरून तात्पुरते दूर करण्याचा निर्णय व्हॅटिकनच्या पोप फ्रांन्सिस यांनी गुरुवारी घेतला होता.
कोट्टायमचे पोलीस अधीक्षक हरिशंकर यांनी सांगितले की, नन बलात्कार प्रकरणाची चौकशी शुक्रवारी पूर्ण करण्याचा निर्णय विशेष तपास पथकाने घेतला आणि त्यानुसार कारवाई करण्यात आली. मुलक्कलची गुरुवारी सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली.

Web Title: The bishop, who raped a minor, is finally arrested

टॅग्स :Arrestअटक